Thursday, April 25, 2024
Homeनाशिकबालकाची हत्या करणाऱ्या नराधमास जन्मठेप

बालकाची हत्या करणाऱ्या नराधमास जन्मठेप

नाशिक | प्रतिनिधी

प्रेयसीच्या अवघ्या सहा वर्षांच्या मुलाची हत्या करणाऱ्या परप्रांतीय नराधम प्रियकराला शुक्रवारी (दि. २६) जिल्हा सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. साहिल उर्फ निरंजन उर्फ पिल्लू जगप्रसाद चर्तुवेदी (३१, रा. खंडोबाचाळ, पंचशीलनगर, एनडी पटेल रोड, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

शरणपूररोडवरील मिशनमळा येथे २६ फेब्रुवारी २०२१८ रोजी सोनुबाई उर्फ सोनाली सुधाकर थोरात (२७) व साहिल चर्तुवेदी यांनी आदल्या दिवशी रात्री जेवनानंतर सोनुबाईच्या पहिला पती संतोष रमेश जाधव यांच्यापासून झालेला मुलगा नकूल (६) याला पॅन्टमध्ये शाैच केली व वर्गात न बसता जंगलात फिरायला जातो तसेच मुलगी नंदीनी (१०) हिला तु मुलांसोबत का बोलतेस ? या कारणावरून धोपटण्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत नकूलचा मृत्यू झाला. तर नंदीनीही गंभीर जखमी झाली होती.

याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या एस्तेर सतिश दलाल यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक अशाेक भगत यांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभय वाघवसे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली.

फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष तसेच तपासी अंमलदारांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायाधीश वाघवसे यांनी साहिल चर्तुवेदीला जन्मठेप व एक हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. वाय. डी. कापसे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार ए. ए. पवार यांनी तर अंमलदार पोलीस नाईक यू. एस. गोसावी यांनी पाठपुरावा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या