Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यालेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lieutenant General Manoj Pandey ) हे देशाचे नवे लष्करप्रमुख (Army chief )असतील. त्यांच्या नियुक्तीला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दर्शवला आहे. 30 एप्रिल रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपवण्यात येणार आहे. सध्याचे लष्करप्रमुख मनोज नरवणे या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. नरवणे यांचा 28 महिन्यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे.

- Advertisement -

मनोज पांडे हे देशातील पहिले इंजिनिअर असतील, ज्यांच्याकडे लष्करप्रमुखाची कमान सोपवली जाईल. मनोज नरवणे यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. जनरल एम.एम. नरवणे हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदासाठीच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी 39 वर्षांच्या लष्करी कारकीर्दीत वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनिअर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माऊंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान आणि निकोबार कमांडच्या कमांडर-इन-चीफची जबाबदारी सांभाळली होती.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची डिसेंबर 1982 मध्ये अभियंता कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बरले (यूके) पदवीधर आहे आणि त्यांनी आर्मी वॉर कॉलेज, महू आणि दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये हायर कमांड कोर्समध्येही सहभाग घेतला आहे. आपल्या 37 वर्षांच्या सेवेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये सक्रिय सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या