Thursday, April 25, 2024
Homeनाशिकलेफ्टनंट अनिकेतची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक

लेफ्टनंट अनिकेतची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक

सिन्नर। प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील किर्तांगळी येथील अनिकेत चव्हाणके (Aniket Chavanke) यांची नुकतीच सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्ती (Appointment as a Lieutenant in the Army) झाल्याने सिन्नरकरांच्यावतीने शहरात त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

- Advertisement -

जागरुकता नसल्याने एनडीएमध्ये (NDM) मराठी टक्का अगदीच कमी आहे. दहावीनंतर लगेचच एनडीएची (NDA) तयारी करता येते. अकरावी, बारावीत अभ्यासावर लक्ष केंद्रित करुन पात्र ठरता येऊ शकते. जेवढी जास्तीत जास्त मुले यासाठी तयारी करतील तेवढे एनडीएतून सैन्य दलात (Military) अधिकारीपदावर जाणार्‍या मुलांचे प्रमाण वाढेल असा विश्वास लेफ्टनंट अनिकेत (Lieutenant Aniket) यांनी यावेळी व्यक्त केला.

बसस्थानकाजवळील महात्मा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. फुले यांच्या पुतळ्यापासून चव्हाणके यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानापर्यंत अनिकेत यांची मिरवणूक (Procession) काढण्यात आली. चौकाचौकात महिलांनी औक्षण करुन तर मित्र परिवाराने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अनिकेत यांचे वडील, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त विकास अधिकारी मुकेश चव्हाणके, आई लता चव्हाणके, भाऊ कुणाल चव्हाणके, चुलते, स्टाइसचे माजी चेअरमन अरुण चव्हाणके, काकू पंचायत समितीच्या माजी सभापती सुलोचना चव्हाणके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिक व सिन्नर येथील सायकलिस्ट ग्रुपचे पदाधिकारी, ढग्या डोंगर ट्रेकर्स ग्रुपचे सदस्य, विविध सेवाभावी संघटनांसह राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

असा केला लेफ्टनंटपर्यंतचा प्रवास

अनिकेत चव्हाणके यांचे प्राथमिक शिक्षण सिन्नरच्या नवजीवन स्कूलमध्ये झाले. दहावीपर्यंत नाशिक येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अकरावी, बारावी औरंगाबाद येथे करत एनडीएची तयारी केली. एनडीएसाठी सिलेक्शन झाल्यानंतर पुणे येथे तीन वर्षे एनडीएचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. डेहराडून येथे एक वर्षाचे सैन्य दलाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर लेफ्टनंट पदावर त्यांना संधी मिळाली आहे. आता श्रीनगर येथे 15 दिवस आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशातील सोलन येथे त्यांना नियुक्ती मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या