कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या दहा औषध दुकानदारांचे परवाने निलंबित

jalgaon-digital
2 Min Read

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या दहा औषध दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याबरोबरच विनापरवानगी उत्पादित केलेले २० हजार रुपये किमतीचे सॅनिटायझर जप्त करण्याची धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. नियमानुसार शैक्षणिक अर्हता व कौन्सिलची मान्यता नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडील कागदपत्रे जप्त करण्यात आली.

जिल्ह्यात योग्य शैक्षणिक अर्हता नसताना काही व्यक्ती अॅलोपॅथिक औषधांद्वारे उपचार करीत असल्याच्या तक्रारीसह काही औषध विक्रेत्यांकडून कायदेशीर तरतुदींचे पालन होत नसल्याची बाब अन्न व औषध शासनाच्या लक्षात आली होती. प्राप्त तक्रारींची खातरजमा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात धडक मोहीम राबविली.

त्यात शहरासह नांदगाव,नायगाव येथील राजेंद्र विसपुते, पिंटूकुमार विश्वास, राधेश्याम गुप्ता आणि साई क्लिनिक यांच्यासह सातपूर येथील सोनावणे यांच्यासह पाच व्यक्ती अंलोपॅथिक औषधांद्वारे वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची बाब आढळून आली. बोगस डॉक्टरांवर आळा घालून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी संबंधितांकडून कागदपत्रे जप्त करुन पडताळणी आणि पुढील कारवाईसाठी प्रक्रिया राबवण्यात आली.

जादूटोणा उपाय-आक्षेपार्ह जाहिराती कायद्यान्वये जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली गेली. त्या अंतर्गत तीन ठिकाणी छापे टाकून साडेबारा लाखाहून अधिक किमतीची औषधे जप्त करण्यात आली. इगतपुरी येथील एका क्लिनिकमध्ये एक गृहस्थ असाध्य रोगावर इलाज करीत असल्याची जाहिरात होती. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. औषधाच्या वेष्टनावर आक्षेपार्ह जाहिरातीचा मजकूर आढळल्याने तळेगाव येथील एका कंपनीचा औषध साठा जप्त करण्यात आला.

जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आली आहेत. तर ६९ परवानेधारक औषध विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. त्यात तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या दहा आस्थापनांवर (मेडिकल दुकाने) परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

मालेगाव, दिंडोरीत औषधसाठा जप्त

मालेगाव येथे विभागाने पोलिसांसोबत संयुक्त मोहीम राबवून सुमारे सात हजार रुपयांचा औषधसाठा जप्त केला.या प्रकरणी आयेशानगर, आझादनगर आणि मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी येथे विनापरवानगी उत्पादित केलेले २० हजार रुपये किंमतीचे हात स्वच्छ करणारे द्रावण (सॅनिटायझर) जप्त करण्यात आले.

अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे,नाशिक विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश देशमुख, प्रशांत ब्राम्हणकर, महेश देशपांडे आदीसह अधिकाऱ्यांनी रिटेल केमिस्ट अॅड इंगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनंजय खाडगीर यांच्या सहकार्यने ही धडक मोहीम राबविली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *