परवानाधारक स्टॅम्प वेंडरकडून सर्वसामान्य ग्राहकांची लूट

jalgaon-digital
3 Min Read

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तहसील आवारात अनेक अधिकृत शासनमान्य स्टॅम्प वेंडर, मुद्रांक, न्यायालयीन तिकीट यासाठी ठराविक

रकमेपेक्षा जास्त पैसे आकारत असल्याबाबत लेखी तक्रारी प्राप्त झाल्या असून तालुका पदाधिकारी यांनी तहसील परिसरात स्टिंग ऑपरेशन केले आहे.याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलदार योगेश चंद्रे यांची भेट घेऊन निवेदन देत महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणार्‍या स्टॅम्प वेंडर व पाठीशी घालणार्‍या अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करून दोषींचे परवाने रद्द करावे अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यातील तहसील कार्यालयीन आवारात मुद्रांक व न्यायालयीन तिकीटापोटी अधिक रक्कम घेतली जात नसून मात्र कोपरगाव तालुक्यातील तहसील आवारात अधिकाराचा गैरवापर करत जनतेची दिवसा लूट सुरू असल्याचे चित्र असून आजपासून कुठल्याही ग्राहकाने अधिक पैसे देऊ नयेत, असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले.

काही वृत्तपत्रांनी 100 रुपयांच्या मुद्रांकासाठी 10 रुपये अधिक व न्यायालयीन तिकिटासाठी 2 रुपये अधिक घेऊन सर्वसामान्यांची लूट होत असल्याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती. याची शिवसेनेने तात्काळ दखल घेऊन तहसील परिसरात अनेक दिवसांपासून अनधिकृत दुकानदार मुद्रांक विक्री करत असल्याबाबत व अधिक पैसे घेत असल्याबाबत कक्ष उपतालुकाप्रमुख सतीश पवार व रोहित पवार यांनी स्टिंग ऑपरेशन केले अशी माहिती मुकुंद सिनगर यांनी दिली. जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे म्हणाले, शिवसेनेच्या सत्तेचा केंद्रबिंदू सामान्य जनता असून जर जनतेची फसवणूक होत असेल तर शिवसेना कदापी सहन करणार नाही.

शासकीय अधिकारी यांनी कुणालाही परवाने द्यावेत. परंतु अधिक पैसे आकारले जाऊ नयेत. जिल्हा कार्यालयप्रमुख अ‍ॅड. राहुल नवले म्हणाले की, दुय्यम निबंधक व मा.उपकोषागार अधिकारी यांनी कोपरगाव तालुक्यातील हा प्रकार कायमस्वरूपी बंद करावा व यापुढे अधिकृत परवानाधारक यांच्याकडूनच मुद्रांक व न्यायालयीन तिकीट विक्री केली जावी. तरी ही बाब अतिशय गंभीर असून तातडीने योग्य ते आदेश अथवा सूचना द्याव्यात अन्यथा यासंदर्भात संबंधित अधिकारी यांना दोषी समजून मा.जिल्हाधिकारी व मा.ग्राहक न्यायालय यांच्याकडे तक्रार केली जाईल, याची नोंद घ्यावी.

यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, मुकुंद सीनगर, शहरप्रमुख कलविंदर दडीयाल, वाहतूक सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे, उपशहरप्रमुख गगन हाडा, विकास शर्मा, इरफान शेख यांच्यासह कोपरगावचे कक्ष उपजिल्हाप्रमुख सुधाकर वादे, कोपरगाव कक्ष तालुकाप्रमुख अशोक पवार, कक्ष शहरप्रमुख रवींद्र कथले, कक्ष उपतालुकाप्रमुख देविदास मोरे, कक्ष उपशहरप्रमुख राहुल देशपांडे, माधव आहेर, सतीश शिंगाने, उत्तम जाधव, विकास माळवे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *