Friday, April 26, 2024
Homeनगरपरवानाधारक रिक्षाचालकांना तातडीने आर्थिक मदत

परवानाधारक रिक्षाचालकांना तातडीने आर्थिक मदत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाची दुसरी लाट सुरू असून राज्यात लागू झालेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बुडणार्‍या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांच्या खात्यात अटींवर प्रत्येकी 1500 थेट बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

करोनाच्या दुसरी लाट सुरू असल्याने लॉकडाऊन सुरू आहे. या काळात लोकं घरी बसलेली असताना रिक्षावालेंचा व्यवसाय बंद पडतो. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निधीची घोषणा केली होती. त्यानुसार अटी आणि शर्तींवर हा निधी संबंधितांच्या खात्यात जमा होणार आहे.

हे अर्थसहाय्य हे डीबीटी प्रणालीद्वारे रिक्षाचालकांना अदा करण्यात येणार आहे. त्यासाठी महा.आय.टी.. मार्फत पोर्टल विकसीत करून त्याद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याचे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या