Tuesday, May 14, 2024
Homeनाशिक२९ मार्च रोजी आरटीओत लायसन्स चाचणी होणार

२९ मार्च रोजी आरटीओत लायसन्स चाचणी होणार

पंचवटी | Panchavti

धुलीवंदन सणानिमित्त २९ मार्च रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयास शासकीय सुट्टी जाहीर केली असून या दिवशी देखील लर्निंग व पक्क्या चाचणी होणार असून त्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करून कार्यालयात वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे .

- Advertisement -

धुलिवंदन सणानिमित्त २९ मार्च रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयास शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. परंतु सद्यस्थितीत कार्यालयात शिकाऊ ( लर्निंग ) व पक्या लायसन्स साठी ६० दिवसापर्यंत उमेदवारांच्या आगाऊ वेळ पूर्ण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे पक्क्या लायसन्स साठी अनेक उमेदवारांच्या लर्निंग लायसन्सची मुदत ३१ मार्च रोजी पूर्ण होत होत असल्याने अर्जदारांकडून आगाऊ वेळ मिळण्याबाबतची विनंती करण्यात आली होती.

त्यादृष्टीने ज्या उमेदवारांच्या लर्निंग लायसन्सची मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपत आहे अशा लर्निंग लायसन धारकांचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सोमवार २९ मार्च २०२१ रोजी कार्यालयात पक्क्या लायसन्सची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे २९ मार्च रोजी अशा उमेदवारांनी ऑनलाइन अपॉईंटमेंट घेवून कार्यालयात पक्क्या लायसन्सच्या चाचणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात वेळेत उपस्थित

रहावे असे प्रादेशिक परिवहन अधिकारी आवाहन कळसकर यांनी केले आहे .यासाठी उमेदवारांनी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावरून दि.२९ मार्च २०२१ साठी शुक्रवार दि. २६ रोजी सकाळी ८ वाजता अपॉइंटमेंट सुरू करण्यात येणार आहे असेही कळसकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या