Sunday, May 5, 2024
Homeधुळेमौजे हिसाळेतील रेशनदुकानाचा परवाना रद्द

मौजे हिसाळेतील रेशनदुकानाचा परवाना रद्द

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील मौजे हिसाळे येथील स्वस्त धान्य दुकान क्र. 22 चा परवाना जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी रद्द केला असून दुकानदारास सुमारे पावणे तीन लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

- Advertisement -

दंडाची रक्कम एका महिन्यात न भरल्यास संबधित स्वस्त धान्य दुकानदाराविरुध्द फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दिले आहेत.

मौजे हिसाळे येथील स्वस्त धान्य दुकानदार विजयसिंग विठ्ठलसिंग परदेशी यांच्या विरुध्द लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, जास्तीचे पैसे घेणे, पावती न देणे आदी तक्रारी ग्रामस्थांनी केलेल्या होत्या.

या तक्रारीवरुन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानदार यांचा परवाना दि.8 नोव्हेंबर 2019 रोजी रद्द केलेला होता. या आदेशाविरुध्द स्वस्त धान्य दुकानदार यांनी उपआयुक्त (पुरवठा) नाशिक यांच्याकडे अपील अर्ज केलेला होता.

सदर अपील अर्जात फेर चौकशी करण्याचे आदेश उपआयुक्तांनी (पुरवठा, नाशिक) यांनी दिले होते. त्याअनुषंगाने दि. 4 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी गावी जाऊन तपासणी केली. सर्व लाभार्थ्यांचे जाब-जबाब घेतले.

त्यात ग्राहकांच्या तक्रारीत तथ्य आढळुन आले. स्वस्त धान्य दुकानदार यांनी लाभार्थ्यांना कमी दिलेले धान्य व जास्त वसूल केलेले पैसे वसूल का करण्यात येऊ नये? याबाबत दुकानदारास नोटीस देऊन खुलासा मागितला असता, ते समाधानकारक खुलासा देऊ शकले नाही.

म्हणुन दुकानदार यांच्याकडुन 2 लाख 76 हजार 485 रूपये वसूल करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दिले आहे. तसेच संपुर्ण अनामत रक्कम जप्त करुन परवाना कायमस्वरुपी रद्य करण्यात आलेला आहे.

संबधित स्वस्त धान्य दुकानदार यांचा परवाना तक्रारीवरुन यापुर्वीही दोन ते तीन वेळा रद्य करण्यात आलेला आहे. तरीही त्यांच्या वर्तणुकीत फरक न पडल्यामुळे त्यांच्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात आली आहे.

संबधित रकमेचा भरणा एका महिन्यात न केल्यास दुकानदार यांच्या विरुध्द जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 अन्वये फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या