Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशपॉलिसीधारकांनो सावधान!, LIC ने केलं अलर्ट

पॉलिसीधारकांनो सावधान!, LIC ने केलं अलर्ट

दिल्ली l Delhi

एलआयसी (LIC) ही भारतातील सर्वात विश्वासार्ह संस्था आहे. एलआयसीने देशभरात सर्वाधिक लोकप्रियता प्राप्त केली आहे. भारतातील जवळपास प्रत्येक कुटुंब एलआयसी संस्थेशी जोडलं आहे. एलआयसी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे ही लोकांची पहिली पसंती ठरत आहे. दरम्यान एलआयसीने पॉलिसीधारकांसाठी (LIC Policyholders) एक संदेश जारी केला आहे.

- Advertisement -

या मेसेजमध्ये एलआयसीने स्पष्टपणे म्हटलं आहे की, बनावट फोन कॉलद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. ग्राहकांना अशा फोन कॉलबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. एलआयसी अधिकारी, IRDAI अधिकारी बनून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे कंपनीने आपल्या ट्विट अकाऊंटवरून म्हटलं आहे. आपणास LIC किंवा IRDAI अधिकाऱ्याने कॉल केला आहे, असं सांगून पॉलिसीधारकांची फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे योग्य सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.

याशिवाय LIC ने काही महत्त्वपूर्ण टिप्सही दिल्या आहेत. पॉलिसीधारक कोणतीही माहिती मिळवण्यासाठी www.licindia.in च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. याशिवाय नजीकच्या एलआयसी शाखेत जाऊनही माहिती मिळवू शकतात. पोलिसीधारकांना फसवणूकीचे कॉल आल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्लाही एलआयसीने दिला आहे. तसेच तुम्ही [email protected] या ईमेल आयडीवर आपली तक्रार नोंदवू शकता. कोणत्याही संशयास्पद कॉलवर जास्त वेळ बोलू नका. तसेच पॉलिसीमधील आवश्यक तपशील शेअर करू नका. जर कोणी बोनस, जास्त नफा अशा ऑफर देत असतील, तर त्याकडे लक्ष देऊ नका. कंपनीने कोणतेही नवीन धोरण आधलेले नाही, असंही एलआयसीने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत कॉलद्वारे फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे एलआयसी, ईपीएफओ व्यतिरिक्त देशातील विविध बँका आपल्या ग्राहकांना वारंवार सतर्क राहण्याच्या सुचना देत असतात. आपण सावधगिरी न बाळगल्यास आपले मोठे नुकसान होऊ शकते, असंही कंपनीने म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या