विद्यार्थिनींची पंतप्रधानांना पत्रे

jalgaon-digital
1 Min Read

सिन्नर । वार्ताहर Sinnar

येथील चांडक कन्या विद्यालयात Chandak Girls Vidyalaya केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड Central Board of Secondary Education यांच्यातर्फे घेण्यात येणार्‍या ‘आजादी का अमृत महोत्सव’ ‘Amrit Mahotsav of Independence’ या अंतर्गतआयोजीत पत्रलेखन उपक्रमात In letter writing activities 228 विद्यार्थिनींनी भाग घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले Letters from the students to the Prime Minister .

2047 सालातील माझ्या कल्पनेतील भारत व अज्ञात क्रांतिकारक’ या पैकी एका विषयावर पत्रलेखन करून ते पोस्टात पाठवायचे होते. विद्यार्थिनींनी विद्यालयाच्या प्रागणांत 75 या आकड्यानुसार बसून पत्र लिहून त्याद्वारे आपल्या भावना पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका रेखा हिरे, शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय व पर्यवेक्षक चंद्रभान कोटकर यांचे मार्गदर्शन लाभले. नीलिमा दुसाने, संयुक्त कुलकर्णी, जागृती टिळे, सुवर्णा सोनवणे यांनी यासाठी परिश्रम घेतले. यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विवेक मोरे, पर्यवेक्षक चंद्रभान कोटकर उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *