Saturday, April 27, 2024
Homeनगरदुध भाव वाढीसाठी "लेटर टू मिनिस्टर" आंदोलन

दुध भाव वाढीसाठी “लेटर टू मिनिस्टर” आंदोलन

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

तालुक्यातील प्रवरासंगम (Pravarasangam) येथे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या (Milk Producers Farmers Sangharsh Committee) वतीने दूध भाव वाढीसाठी “लेटर टू मिनिस्टर” (Letter to Minister) आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

Corona Update : जिल्ह्यातील करोनाचे संकट गडद? रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा….

संपूर्ण महाराष्ट्रातून दूध उत्पादक-पशुपालक यांचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar) यांना दुधाचे भाव वाढून देण्यासाठी हजारो पत्रे पाठविले जात आहेत. हे आंदोलन 10 सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर 35 रुपये व म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर 60 रुपये भाव द्यावा. दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून पशुपालक चिंताक्रांत झालेले आहेत.

दुग्ध विकास मंत्री यांनी दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी व सर्व हिशोब समाजापुढे मांडावे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल शेतकऱ्यांची दुधाला एफआरपी कायमस्वरूपी लागू करण्याची मागणी योग्य असल्याची समाजापुढे आली पाहिजे. हे आंदोलन आज पशुपालकांनी अत्यंत शांततेच्या व अहिंसक मार्गाने चालवलेले आहे याची दखल घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील असा गंभीर इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात डॉ.अशोकराव ढगे, भिमराज शिंदे, आप्पासाहेब खरात, बापूसाहेब डावकर, काकासाहेब मते, रामकिसन कोरडे, अनिल डावकर, सोमनाथ उदे, दिपक वाघमारे आदी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या