‘आरटीई’ अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची शक्यता कमी

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

आरटीईची लॉटरी 6 एप्रिलला जाहीर होण्याची शक्यता आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेत यंदा नऊ हजार 432 शाळांनी नोंदणी केली असून, प्रवेशासाठी एकूण 96 हजार 684 जागा उपलब्ध आहेत.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांत राखीव असणार्‍या 25 टक्के जागांसाठी राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेशप्रक्रियेची लॉटरी येत्या सहा एप्रिलला जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रवेशाची लॉटरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यासाठीचे नियोजन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

या प्रवेशप्रक्रियेत दोन लाख 21 हजार 548 पालकांनी मुलांच्या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज भरले आहेत. प्रवेशप्रक्रियेत यंदा नऊ हजार 432 शाळांनी नोंदणी केली असून, प्रवेशासाठी एकूण 96 हजार 684 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तीन ते 30 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत दोन लाख 21 हजार 548 पालकांनी मुलांच्या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदविल्याचे स्पष्ट झाले आहे.

नोंदणीची मुदत संपल्यावर आता सहा एप्रिलला प्रवेशाची लॉटरी काढण्याचे निश्चित होत आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी तीन एप्रिलपर्यंत ‘डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह’ करण्याचे काम पूर्ण करावे. तीन एप्रिलनंतर फॉर्म रिमूव्ह करता येणार नाही, याची गांभीर्याने नोंद घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी जाहीर होऊ शकते. आरटीई प्रवेशप्रक्रियेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची शक्यता कमी असल्याचे समजते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *