Tuesday, May 14, 2024
Homeनाशिकपावसामुळे मायलेकांची ताटातूट; बछडा पडवीच्या आश्रयाला

पावसामुळे मायलेकांची ताटातूट; बछडा पडवीच्या आश्रयाला

घोटी । Ghoti

इगतपुरी तालुक्यात बिबट्याचे संचारक्षेत्र असलेल्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. कुरुंगवाडी येथील जंगलपरिसरात गेल्या दोन महिन्यांपुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्धाचा बळी गेला या घटनेला दोन महिने उलटत नाही तोच आज पुन्हा कुरुंगवाडीतच एका शेतकऱ्याच्या घराच्या पडवीत बिबट्याच्या बछड्याचा शिरकाव झाला. त्यामुळे परिसरात घबराट उडाली आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वीच पिंपळगाव भटाटा परिसरात बांबळे वाडी येथे बिबटया झोपडीत शिरला होता तर काल रात्री कुरुंगवाडीत मंगळू भावडु पोकळे या आदिवासी बांधवाच्या घराच्या जवळील पडवीत बिबट्याच्या बछड्याने शिरकाव केला. पावसाची रिपरीप चालू असल्याने या बछड्याने पडवीत आश्रय घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान नागरिकांना हि बाब लक्षात येताच वन विभागाला माहिती देण्यात दिली. वनविभागाचे परिक्षेत्र रमेश ढोमसे, वनपरिमंडळ भाउसाहेब राव यांनी घटनास्थळी धाव घेऊन बछड्याचे संरक्षण केले. पडवीबाहेर एका कॅरेट मध्ये सुरक्षित ठिकाणी बछडा ठेऊन नागरिकांना बाहेर काढण्यात आले.

वनविभागाचे अधिकरी व कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत. सायंकाळी बछड्याची आई अर्थात मादी बिबटया आल्यानंतर बछड्यास जंगलात घेऊन जाईल अशी माहिती वनमंडल अधिकारी भाऊसाहेब राव यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या