Thursday, May 2, 2024
Homeनाशिकलहवितरोड परिसरातील शेतात बिबट्या जेरबंद

लहवितरोड परिसरातील शेतात बिबट्या जेरबंद

देवळाली कॅम्प | Deolali Camp वार्ताहर

आज पहाटेच्या सुमारास भगूर परिसरात एक बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला…

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून भगूर शिवारात बिबट्याचा संचार दिसून येत होता. यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क करत याबाबतची माहिती दिली. सततच्या बिबट्याकडून जनावर आणि मनुष्यप्राण्यांवर हल्ल्याचा घटनांना समोर ठेवून वनविभागाने येथील नारायण तानाजी पाटील रा. भगूर मालकी गट न. 315 मध्ये पिंजरा लावला होता.

यानंतर आज सकाळी पहाटेच्या सुमारास अंदाजे 4 ते5 वर्षाचा नर बिबटया या पिंजऱ्यात अडकल्याचे पाटील यांना दिसून आले. यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.

वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन मूळ अधिवासात सोडण्यासाठी नेण्यात आले आहे.

नियमित वावर असलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेची निश्वास सोडला.

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. या भागात एक मादी व दोन बछडे यांचा अजूनही संचार असून त्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी रत्नाकर मोहिते, चंद्रशेखर मोहिते, योगेश कूलथे सह येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या