डाऊच खुर्दमध्ये बिबट्याची दहशत, ब्रँच चारी परिसरात मुक्त संचार

jalgaon-digital
2 Min Read

सोनेवाडी | वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ब्रँच चारी परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याशी दहशत आहे. वेळोवेळी याबाबत वन विभागाला कल्पना देऊनही वन विभागाने पिंजरा लावण्यासाठी काहीच पावले उचलली नाही.

दरम्यान काल थेट बिबट्या डॉ बापुराव गिरमे यांच्या घराच्या पोर्चमध्ये आढळून आला. बिबट्या असल्याचे पुरावे देऊन देखील जर वन विभाग या बिबट्याला जेर बंद करण्यासाठी पिंजरा लावत नसेल तर ही बाब दुर्दैवी आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी लक्ष घालावे व वन विभागाला याबाबत सूचना कराव्यात अशी मागणी डाऊच खुर्दचे सरपंच संजय गुरसळ यांनी केली आहे.

सोमवारी रात्री अकरा वाजता गिरमे वस्ती बिबट्याने आपला मोर्चा वळवला होता. बिबट्याच्या डरकाळीचा आवाज झाल्यानंतर डॉक्टर बापू गिरमे, प्रशांत गिरमे, पिन्कु गिरमे यांनी बाहेर डोकावले असता पोर्चमध्येच बिबट्या दबा धरून बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रशांत गिरमे यांनी बिबट्याचा फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. आरडा ओरड करत बिबट्याला तिथून पळवण्यात आले मात्र नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. तोच बिबट्या पहाटे रेनबो स्कूल परिसरात आकाश नागरे यांच्या वस्तीजवळ आढळून आला. आकाश नागरे यांच्या सीसीटीव्ही मुले त्याचे फुटेज दिसत आहे.

हे सर्व बाब सरपंच संजय गुरसळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ तहसीलदार विजय बोरुडे यांच्याशी संपर्क केला व वन विभागाला या परिसरात पिंजरा लावण्यासाठी आपण तातडीने सूचना कराव्यात अशी मागणी केली. या बिबट्याचे फोटो देखील त्यांनी तहसीलदार बोरुडे यांना पाठवले आहे. बिबट्याचे पुरावे देऊन देखील जर वनविभाग या बिबट्याला जेरबंद करीत नसेल तर ही शोकांतिका असुन वनविभागा विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *