Friday, April 26, 2024
Homeनाशिकपिंपळगाव भटाटा येथील घरात घुसलेला बिबट्या जेरबंद

पिंपळगाव भटाटा येथील घरात घुसलेला बिबट्या जेरबंद

इगतपुरी । Igatpuri

पिंपळगाव भटाटा येथील गांगडवाडीत दिवसाढवळ्या घरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाच्या रेस्क्यु ऑपरेशन पथकाला यश आले आहे.

- Advertisement -

वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या नेतृत्वाखाली बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यु ऑपरेशन राबवण्यात आले होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबटयाला जेरबंद करण्यात या पथकाला यश आले.

बिबटयाचे वय अंदाजे दिड वर्ष असल्याची माहिती रमेश ढोमसे यांनी दिली. काल दोन बिबटे या परीसरात कुत्र्याचा पाठलाग करीत असतांना एक बिबटया गोविंद हिंदोळे यांच्या घरात शिरला व दुसरा बिबट्या फरार झाल्याचे ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले. दुसरा फरार बिबटयाचाही शोध वनविभागाच्या पथकाकडून केला जात आहे.

मंगळवारी दिवसाढवळ्या शेतवस्तीवर घरात चक्क बिबट्याची स्वारी अवतरल्याने संबंधित कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांची झोपच उडाली होती. गोविंद बचु हिंदोळे यांच्या घरातच बिबट्याने ठाण मांडल्याने त्यांना कुटुंबीयांसह आपल्या घरातूनच धूम ठोकावी लागली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या