Friday, April 26, 2024
Homeनगरभिंतीवरुन उडी मारुन बिबट्याने अंगणातील कुत्र्याचे पिल्लू पळविले

भिंतीवरुन उडी मारुन बिबट्याने अंगणातील कुत्र्याचे पिल्लू पळविले

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

बंगल्याच्या उंच भिंतीवरुन उडी मारुन बिबट्याने अंगणात असलेले कुत्र्याचे पिल्लू पळविल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील इरिगेशन बंगला परिसरातील भर वस्तीत काल रात्री साडे दहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

देवळाली प्रवरा येथील इरिगेशन बंगला परिसरात अनिल लक्ष्मण सिनारे यांनी कुत्र्याचे पिल्लू पाळले होते. हे पिल्लू बंगल्याच्या आवारात बसले होते. काल मकर संक्रांतीच्या रात्री रात्री साडे दहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने बंगल्याच्या भिंतीवरुन आत उडी घेत काही क्षणात कुत्र्याचे पिल्लू उचलून नेले. यावेळी पिल्लाच्या आवाजाने सिनारे कुटुंबातील सदस्य घराबाहेर आले तोपर्यंत बिबट्या पिल्लू घेऊन भिंतीवरुन उडी घेत तेथून मक्याच्या शेतातून पसार झाला.

बंगल्याच्या भिंतीवर व अंगणातील फरशीवर बिबट्याच्या चिखलाने भरलेल्या पायाचे ठसे उमटले आहेत. या घटनेने सिनारे कुटुंबीय भयभित झाले आहे. काल त्यांनी रात्र जागून काढली. बिबट्यानेभर वस्तीत घुसण्याचे धाडस केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

यापुर्वीही या परिसरातून बिबट्याने कुत्र्यांचा फडशा पाडलेला आहे. या ठिकाणी ओढ्याच्या परिसरात बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे. त्यामुळे येथे त्याचे नेहमी वास्तव्य असते. वन विभागाने याची दखल घेऊन परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या