Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकबिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

देवळाली कॅम्प। वार्ताहर Deolali Camp

नाशिक तालुक्यातील लहवीत (Lahvit Tal. Nashik) येथे मृत बिबट्या (leopard deadbody) आढळल्याने खळबळ उडाली आहे….

- Advertisement -

उन्हाळ्यामध्ये दारणा पट्ट्यामध्ये बिबट्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर असते. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून बिबटे सुरक्षित स्थळी जंगलात वावरत आहेत. मात्र, काल (दि ०५) काळे मळा परिसरातील उत्तमराव काळे यांच्या घरासमोर दीड वर्षाचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

याबाबत काळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांना माहिती दिली. यानंतर त्यांच्यासह वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक विजयसिंह पाटील व अंबादास जगताप हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी बिबट्याची (Leopard) पाहणी केली असता तो आजारी असल्याने मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवला आहे. या बिबट्याला वनविभागाने गंगापूर येथील शासकीय रोपवाटिकेत नेले असून याठिकाणी त्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या