Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासात तासांच्या अथक प्रयत्नाअंती बिबट्या जेरबंद; बघ्यांच्या गर्दीमुळे आल्या अडचणी

सात तासांच्या अथक प्रयत्नाअंती बिबट्या जेरबंद; बघ्यांच्या गर्दीमुळे आल्या अडचणी

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

तब्बल सात तासाच्या परिश्रमानंतर येथील जय भवानी रोड (jay bhavani road) परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. वनकर्मचारी उपनगर पोलीस स्टेशन व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने हा बिबट्या जेरबंद करण्यात आला. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिक व महिला यांनी सुटकेचा निश्वास सोडला. (leopard caught in the cage)

- Advertisement -

आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास जय भवानी रोड (jay bhavani road) येथील शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड (Shivsena Rajendra Gaikwad) यांच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या उद्यानात बिबट्याने दर्शन दिले. (leopard seen at near home)

या ठिकाणी बिबट्याला तेथील महिलांनी बघितल्यानंतर नागरिकांना सांगितले. या घटनेनंतर बिबट्या तेथून भर रस्त्याने वावरत होता. बिबट्या फर्नाडिस वाडी (farnadis wadi) येथे

राहणाऱ्या सुनील बहनवाल (sunil bahanwal) यांच्या घरात शिरला होता. परंतु अचानक बिबट्याला पाहून बहनवाल कुटुंब बाहेर आले. त्यानंतर बिबट्या हा तेथून पसार झाला.

के जे मेहता हायस्कूल (k k mehata highschool) परिसरात असलेल्या एका बंगल्याच्या आवारात असलेल्या गाडीखाली लपला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व नागरिकांना बघताच बिबट्या तेथून बाहेर निघाला व एका बंगल्याच्या हा बारात चालत गेला.

याच दरम्यान सदर बिबट्याने क्षत्रिय नावाच्या एका इसमावर हल्ला केल्याने संबंधित इसम बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाला. परिणामी घटनास्थळी उपनगर पोलीस वनविभागाचे कर्मचारी यांना बिबट्याला पकडण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. (one injured in an leopard attack)

परंतु बिबट्या हाती लागत नव्हता. या घटनेनंतर नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दी हटवणे मुश्कील झाले होते. त्यामुळे बिबट्या हा घाबरून एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत जात होता.

भरवस्तीत बिबट्या घुसल्यामुळे घरातील नागरिक महिला व लहान मुले घाबरलेल्या अवस्थेत होते. दरम्यान, याच परिसरात राहणाऱ्या एड. सोमनाथ गायकवाड यांच्या बंगल्यातील आवारात असलेल्या मारुती सुझुकी गाडी क्रमांक एम एच 15 ए एच 48 40 या गाडीच्या खाली लपला.

तत्पूर्वी घरात राहणाऱ्या संगीता गायकवाड (Sangeeta gaikwad) यांच्यावरील बिबट्याने झडप मारण्याचा प्रयत्न केला परंतु गायकवाड यांनी प्रसंगावधान राखून बिबट्याचा हल्ल्यातून वाचविण्यात यश मिळवले.

दरम्यान, या घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी उपनगर पोलीस व स्थानिक नागरिक यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. चारही बाजूने जाळ्या टाकून बिबट्याला बेशुद्ध होणारे इंजेक्शन देऊन जेरबंद केले. बिबट्याला जेरबंद करताच त्याला बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. बिबट्या जेरबंद करण्यात आल्यानंतर नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या