Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपोल्ट्रीची जाळी तोडत बिबट्याचा 200 कोंबड्यांवर हल्ला

पोल्ट्रीची जाळी तोडत बिबट्याचा 200 कोंबड्यांवर हल्ला

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील कासारवाडी (Kasarwadi) परिसरात रविवारी (दि.27) मध्यरात्रीच्या वेळी बिबट्याने (Leopard) एका पोल्ट्री फार्मची (Poultry Farm) जाळी तोडून आत प्रवेश करत 200 कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली…

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून कासारवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त वावर दिसून येत असल्याचे शेतकरी सांगत आहे.

कासारवाडी येथे वैभव चंद्रकात देशमुख यांची 5 हजार कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म आहे. महिनाभरापूर्वीच त्यांनी पोल्ट्रीत कोंबड्या टाकल्या होत्या. सद्यस्थितीत कोंबड्यांचे वजन दिड किलोच्या आसपास आहे. रविवारी (दि.27) रात्री बिबट्याने पोल्ट्री फार्मची जाळी तोडून आत प्रवेश केला आणि कोंबड्यांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.

बिबट्याने अनेक कोंबड्या फस्त करत तेथून पळ काढला. कोंबड्याचा आवाज ऐकूण शेजारीच राहत असलेले देशमुख यांनी बघितले असता अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे लक्षात आले. यात जवळपास 200 कोंबड्या मृत पावल्या आहे.

विशेष संवाद कट्टा : बिबट्यांची वाढती संख्या आणि दक्षता

सकाळी ग्रामस्थांना याबाबत माहिती कळताच माजी उपसरपंच सचिन देशमुख यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती देत तात्काळ पंचनामा करण्याची मागणी केली.

वनविभागाचे आकाश रुपवते यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. देशमुख यांचे यामुळे लाखांचे नुकसान झाले असून तात्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. वनविभागाकडून पिंजऱ्याची तरतूद केली जात असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष निलेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दत्ता देशमुख, अनिल देशमुख, नंदू देशमुख, शुभम लोकरे, मोरया मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज जगताप, चंद्रकांत देशमुख, सोमा साळुंखे, लवेश साळुंखे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या