बिबट्याच्या हल्ल्यात मृत सार्थकच्या कुटुंबियांना शासकीय मदत

jalgaon-digital
2 Min Read

तिसगाव |वार्ताहर| Tisgav

पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील सार्थक बुधवंत या चार वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी बुधवंत कुटुंबियांची भेट घेऊन मयत मुलाचे वडील संजय बुधवंत यांच्याकडे पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.

तसेच पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर पाच लाख तर दहा वर्षांच्या मुदत ठेवीवर आणखी पाच लाख अशी एकूण पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत बुधवंत कुटुंबियांना करण्यात येणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी यावेळी सांगत उर्वरित 10 लाख रुपये दोन-चार दिवसांत त्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर या परिसरात पुन्हा अशी घटना घडू नये यासंदर्भातही वनविभागाचे जिल्हा उप वनरक्षक किशोर सोनवणे, तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी सांगितले मढी, शिरपूर, करडवाडी, सावरगावघाट परिसरात एकूण बावीस पिंजरे लावण्यात आले आहेत.

बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी शार्पशुटरच्या चार टीम 24 तास गस्त घालत आहेत तसेच सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून चार टीम दोन सदरात शोध घेत आहेत. या परिसरात जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 75 वनकर्मचारी काम करत असून पुणे, नाशिक, जळगाव, औरंगाबादहून बिबट्याला पकडणारी विशेष पथके आली असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

यावेळी गटविकास अधिकारी जगदीश पालवे, वनरक्षक मेहबूब शेख, माजी सरपंच बबन बुधवंत, बाबा बुधवंत, संजय पाखरे, गणेश कराड, गणेश शिंदे, देवा झरेकर, सरपंच अमोल वाघ, जालिंदर वामन, रवींद्र मुळे उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *