Sunday, April 28, 2024
Homeनगरश्रीगोंदा : लिंबू व्यापारी करणार लिलाव पद्धतीने खरेदी

श्रीगोंदा : लिंबू व्यापारी करणार लिलाव पद्धतीने खरेदी

श्रीगोंदा|प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात लिंबू खरेदी करणारे लायसन धारक व्यापाऱ्यानी लिलाव करून लिंबू खरेदी करणार नसल्याचे जाहीर करत खरेदी बंद केली होती. यामुळे बाजार समितीने अकरा जणांचे लायसन्स रद्द करत नोटिसा बजावल्या होती. मात्र दिनांक १४ रोजी राजकीय नेते यांच्या उपस्थितीत बैठक होऊन लिलाव करून लिंबू खरेदी करण्यास सुरुवात करण्याचे ठरले. मात्र आता यांचे लायसन्स रद्द झाले आहेत.

- Advertisement -

तालुक्यात लिंबू खरेदी वरून राजकारण करून शेतकरी आणि लिंबू व्यापारी यांच्या मध्ये एक सामजिक संघटनेने असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला .त्यामुळे बेकायदेशीर पणे व्यावसायिकांचे परवाने निलंबित केले.

परंतु मंगळवारी नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे, सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर ,सभापती पदाचा राजीनामा दिलेले धनसिंग भोईटे, बाळासाहेब नाहटा, श्री संजय आबा जामदार, विट्ठलराव पाचपुते, संजय महानडुळे, भास्करराव वागस्कर, लहानू धायगुडे, मीनाताई आढाव, उर्मिलाताई गिरमकर, शैलाताई काटे ,।सतीश पोखरणा, उमेश पोटे या सर्व संचालक व शेतकरी प्रतिनिधी या सर्वांनी शेतकरी बंधूंचे नुकसान व होणारी गैरसोय लक्ष्यात घेऊन लिंबू लिलाव पध्दतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित निर्णय घेऊन लिंबू खरेदी चालू केली आहे. सर्व शेतकरी बंधूंची दिलगिरी व्यक्त करत असल्याचे संचालक उमेश पोटे यांच्या संदेशात म्हंटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या