Wednesday, April 24, 2024
Homeनगरवाहनांच्या एलईडी दिव्यांमुळे अनेकांच्या जिवनात अंधार

वाहनांच्या एलईडी दिव्यांमुळे अनेकांच्या जिवनात अंधार

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

दुचाकींना लावले जाणारे हलक्या प्रतिचे दिवे अतिशय प्रकाशमान असल्याने समोरच्या येणार्‍या वाहनाला या दिव्यामुळे पुढे काहीच दिसत नाही.

- Advertisement -

त्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. अशा दिवे लावणार्‍या वाहनांच्या चुकीच्या प्रकाशामुळे मात्र अनेकांच्या जिवनात अंधार आला आहे.

विजेची बचत होण्यासाठी घरात व कार्यालयात एलईडी दिव्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. घरात व कार्यालयामध्ये याचा फायदा होत आहे मात्र अनेकांनी अगदी हलक्या प्रतीचे एल ई डी दिवे बाजारातून घेऊन दुचाकींना बसवले आहेत. शहरांत आणि ग्रामीण भागात दुचाकीला सर्रास अत्यंत प्रकाशमय दिवे बसवले जात आहेत.

या प्रकाशामुळे जरी दुचाकीचे आकर्षण वाढत असले तरी, ते रस्त्याने चालेल्या इतर वाहन चालकांचा होणार्‍या अपघातातून मृत्यू, अपंगत्व यातून त्यांचे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांचे जीवन मात्र अंधःकारमय करण्यास कारणीभूत ठरत आहेत. मात्र याकडे परिवहन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

या प्रकारच्या अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे. इतर अनेक कारणांनी वाहनावर कारवाई केली जाते मात्र वाहतुकीस घातक असलेले दिवे लावलेल्या वाहनांवर कार्यवाही होताना दिसत नाही आजचा काही तरुण वर्ग फक्त वेगळेपण म्हणून असे दिवे वापराताना दिसत आहे. परिवहन व पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली तर या दिव्यांमुळे रात्रीच्यावेळी होणारे अपघात व त्यामुळे निरपराधांचे जाणारे जीव वाचतील हे मात्र नक्की.

- Advertisment -

ताज्या बातम्या