Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापरमपूज्य वै.बस्तीरामजी सारडा पुण्यतिथीनिमित्त आज चैतन्य महाराजांचे व्याख्यान

परमपूज्य वै.बस्तीरामजी सारडा पुण्यतिथीनिमित्त आज चैतन्य महाराजांचे व्याख्यान

नाशिक । प्रतिनिधी

परमपूज्य वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांचा 58 वा पुण्यतिथी सोहळा आज, रविवारी (17 जानेवारी) साजरा होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील नाशिककरांचे आवडते प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे व्याख्यान आज सायंकाळी 6 वाजता येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे.

- Advertisement -

‘ज्ञानदेवांची सूक्ष्म निरीक्षणे’ हा व्याख्यानाचा विषय आहे. चैतन्यमहाराजांच्या रसाळ आणि ओजस्वी वाणीतून आध्यात्मिक विचार ऐकण्याची दुर्मिळ संधी श्रोत्यांना लाभणार आहे.

गेली 10-12 वर्षे चैतन्यमहाराजांच्या प्रासादिक वक्तृत्वाचा आस्वाद नाशिककर भाविक घेत आहेत. श्रोत्यांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळेच व्याख्यानमालेचा हा ज्ञानयज्ञ अखंड सुरू आहे. तथापि दरवर्षी तीन दिवस चालणारा हा सोहळा सातत्य राखण्यासाठी करोना सावटामुळे यंदा एक दिवसाचा होत आहे.

श्रोत्यांनी उपस्थित राहून व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा, व्याख्यानास उपस्थित राहताना तोंडावर मुसके आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

व्याख्यानाचा आस्वाद घेण्यासाठी https://youtu.be/GuHeG_O3ro0 येथे क्लिक करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या