पिंपळगाव ग्रामपालिकेसाठी दुसर्‍यांदा आरक्षण सोडत

jalgaon-digital
3 Min Read

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant) ग्रामपालिकेच्या सहा वॉर्डातील 17 जागांसाठी दि.6 जून रोजी आरक्षण (Reservations) काढण्यात आले होते.

त्या जाहीर झालेल्या प्रभागनिहाय आरक्षणावर (Ward wise reservation) सात जणांनी निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे (Tehsildar of Niphad Sharad Ghorpade) यांच्याकडे हरकती नोंदविल्यानंतर रविवारी दि.19 जून रोजी पुन्हा विशेष ग्रामसभेत पिंपळगाव ग्रामपालिकेचे प्रभागनिहाय अंतिम आरक्षण निफाड तहसीलदार यांनी पुन्हा दुसर्‍यांदा येथील मंडलाधिकारी नीलकंठ उगले यांची प्रारूप अधिकारी म्हणून नेमणूक केली.

प्रारूप अधिकारी निळकंठ उगले यांनी विशेष ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थ व विद्यमान ग्रामपालिका सदस्यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय आरक्षण सोडत चिठ्ठी पद्धतीने सर्वांसमक्ष काढून जाहीर केले. आरक्षण जाहीर होताच उपस्थितांमध्ये आरक्षण मुद्यावरून बराचसा गोंधळ उडाला. आरक्षणप्रश्नी आक्षेप घेत ग्रामसभा स्थगित करण्याची मागणी बाळासाहेब आंबेकर, नीलेश पाटील, किरण लभडे, नितीन बनकर आदींनी लावून धरत आरक्षणाला विरोध दर्शविला.

जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्‍या पिंपळगाव ग्रामपालिकेची (Pimpalgaon Gram Palika) निवडणूक (election) ऑक्टोबर महिन्यात होत आहे. 6 जून रोजी पिंपळगाव ग्रामपालिकेचे वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले होते. जाहीर आरक्षणामुळे अनेक विद्यमान सदस्यांसह इच्छुकांच्या उमेद्वारीवर पाणी फिरले गेल्याने तब्बल सात जणांनी आरक्षण मुद्यावर निफाड तहसील कार्यालयात हरकती नोंदविल्या होत्या. यावर सुनावणी होऊन पुन्हा अंतिम आरक्षण सोडत रविवारी चिठ्ठी पद्धतीने काढण्यात आली.

हरकती नोंदविणार्‍या बहुतांशी इच्छुकांसाठी सोयीचे आरक्षण निघाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला तर चिठ्ठी पद्धतीने आरक्षण जाहीर करताच पुन्हा काहींचा हिरमोड झाल्याने गोंधळ उडाला. नीलेश पाटील यांनी आक्षेप घेत ग्रामसभा स्थगित करण्याची मागणी केली. बाळासाहेब आंबेकर यांनी आरक्षण अभ्यासपूर्ण अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जाहीर करण्याची मागणी केली.

उपस्थितांपैकी सत्यजित मोरे यांच्यासह अनेकांनी पहिले लागू केलेले आरक्षण ठेवण्याची मागणी केली. लोकसंख्येच्या दृष्टीने अनुसूचित जमातीची जागा वॉर्ड 2 मध्ये पाहिजे असून ती वॉर्ड 4 मध्ये कशी असा प्रश्न विद्यमान सदस्य किरण लभडे, नितीन बनकर यांनी उपस्थित करत आक्षेप घेतल्याने ग्रामसभेत गदारोळ उडाला. मंडल अधिकारी नीलकंठ उगले यांनी आरक्षणावर आक्षेप असल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

यावेळी मंडल अधिकारी नीलकंठ उगले, तलाठी राकेश बच्छाव, तलाठी अभिजित पाटील, ग्रा.वि.अ. लिंगराज जंगम, गणेश बनकर, राजेश पाटील, बापूसाहेब पाटील, सतीश मोरे, संजय मोरे, बापू कडाळे, सुहास मोरे, दीपक बनकर, अल्पेश पारख, आशिष बागूल, नंदू गांगुर्डे, राजा गांगुर्डे, राहुल बनकर, केशव बनकर, प्रशांत घोडके, अंकुश वारडे, बाळा बनकर, हर्षल जाधव, योगेश गांगुर्डे, गोरख गांगुर्डे, मंगेश शिरसाठ उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *