Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयअकोल्यातील भाजप-राष्ट्रवादीमधील प्रमुख नेते काँग्रेसमध्ये जाणार

अकोल्यातील भाजप-राष्ट्रवादीमधील प्रमुख नेते काँग्रेसमध्ये जाणार

अकोले l प्रतिनिधी l Akole

अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अगस्ति कारखान्याचे संचालक

- Advertisement -

मिनानाथ पांडे हेही राष्ट्रवादी सोडून काँग्रेसच्या वाटेवर आहेत. याशिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेश सचिव मदन पथवे यांचाही काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे.

मधुकरराव नवले यांचे समवेत तालुक्यातील त्यांचे समर्थकही काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री तथा बाळासाहेब थोरात यांच्याशी पक्ष प्रवेशासंदर्भात बोलणी झाली आहे. लवकरच या सर्वांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. नवले यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढू शकेल अशी चर्चा आहे.

आगामी अकोले नगर पंचायत, अगस्ति सहकारी साखर कारखाना व अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादीमधील प्रमुख कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याने राजकीय क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.तालुक्यात वर्ष भरापूर्वी झालेल्या राजकिय सत्ता बदला नंतर येत्या काळात होणाऱ्या निवडणुका गाजण्याची व रंगतदार होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या