Friday, April 26, 2024
Homeधुळेअवैध बॉयोडिझेल पंपावर कारवाई

अवैध बॉयोडिझेल पंपावर कारवाई

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

तालुक्यातील बोरविहिरी गाव शिवारातील अवैध बायोडिझेल पंपावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली.

- Advertisement -

घटनास्थळाहुन 6 लाख 74 हजार रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी धुळ्यातील पाच जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून एकाला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्य आधारे स्थानिक गुन्हे शाखा व पुरवठा विभागाच्या पथकाने काल दि. 14 रोजी दुपारी चाळीसगाव रोडवरील बोरविहीर फाटा येथे सुपर बायो डिझेल असा बोर्ड असलेल्या पंपावर छापा टाकला. तेथे ट्रकमधून (क्र. जीजे 12 झेड 4642) सईद शहा गणी शहा हा इलेक्ट्रीक मोटारच्या सहाय्याने डीझेल पंपाच्या पाठीमागे असलेल्या लोखंडी टॅकमधून इंधन भरतांना मिळून आला.

चौकशीत हा डिझेल पंप सईद शहा गणी शहा, देवेंद्र आण्णा पाटील, योगेश विश्वासराव पाटील व अखलाख अहमद मोहम्मद हबीब सर्व (रा. धुळे) यांचा संयुक्त मालकीचा असून त्यांच्याकडे डिझेल पंपाबाबत तसेच इंधन साठा, खरेदी व विक्रीच्या कोणत्याही पुर्वपरवानगी नसल्याचे आढळून आले. त्यानंतर ट्रक चालक मोहम्मद हुसेन अबदरमान रायमा (रा. गडसीशा ता. मांडवी जि. कच्छ, गुजरात) यांच्यासह सईद गणी शहा यांना अटक केली आहे. तसेच ट्रकसह 6 लाख 74 हजार रूपये किंमतीचे बायोडीझेल व साहित्य जप्त करण्यात आले.

याप्रकरणी पोहेकाँ श्रीकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सईद शहा गणी शहा व ट्रक चालक मोहम्मद रायमा यांना आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सईद शहा याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधिक्षक डॉ. राजु भुजबळ, एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक हनुमान उगले, कैलास चौधरी, श्रीकांत पाटील, रफिक पठाण, जितेंद्र सोनार, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, तुषार पारधी, मयुर पाटील, राहुल सानप, गुलाब पाटील, केतन पाटील व पुरवठा निरीक्षक छोटू चौधरी यांनी केली आहेे.

- Advertisment -

ताज्या बातम्या