Wednesday, April 24, 2024
Homeनगर१० हजारांचा 'पाहुणचार'

१० हजारांचा ‘पाहुणचार’

संगमनेर l प्रतिनिधी

करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे.

- Advertisement -

त्याअनुषंगाने संगमनेर शहर व तालुक्यात गर्दी होणार्‍या ठिकाणी प्रशासनाकडून कारवाईस सुरुवात झाली आहे. घुलेवाडी येथील पाहुणचार लॉन्स येथे विवाह सोहळ्या निमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळून आले आहे. करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या पाहुणचार लॉन्स चालकाला घुलेवाडी ग्रामपंचायतने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

विवाह सोहळ्यास ५० पेक्षा अधिक व्यक्ती असू नये, असा नियम असतांना निश्‍चित संख्येपेक्षा जास्त उपस्थिती आढळून आल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी गुंजाळवाडी येथील अमृता लॉन्स चालकावर देखील २० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणार्‍या प्रत्येकाने मुखपट्टीचा वापर व सामाजिक अंतराचा नियम पाळण्याचे बंधन असतांना या नियमांचे उल्लंघन पाहुणचार लॉन्स येथील विवाह कार्यक्रमात आढळून आले. त्यामुळे घुलेवाडीचे करोना समितीचे अध्यक्ष तथा सरपंच सोपान राऊत, ग्रामविकास अधिकारी सुभाष कुटे, तलाठी श्री. काकड, सचिव नंदू वाकचौरे यांनी सदर ठिकाणी जावून पाहुणचार लॉन्स चालकावर १० हजार रुपये दंडाची कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या