शिवसैनिकांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे

jalgaon-digital
3 Min Read

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

करोनाशी लढत विकासकामांचा डोलारा सांभाळण्याची कसरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) करीत आहेत. त्यांना आधार देण्यासाठी पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर (Shivsena Worker) आहे. जुना-नवा असा भेद करू नका. शिवसैनिक, बूथप्रुमख संघटनेचा आत्मा आहे. शिवसैनिकांनी निवडणुकीची तयारी (Election Preparation) करावी, असे आवाहन जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख (Water Conservation Minister Shankarrao Gadakh) यांनी केले.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या (Shevgaon-Pathardi constituency) शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ शहरातील गोरे मंगल कार्यालयात मंत्री गडाख यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हा प्रमुख रामदास गोल्हार, सुनील पालवे, महिला जिल्हा संघटक मंगल म्हस्के, प्रवीण अनभुले, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे संघटक भगवान दराडे, तालुकाप्रमुख अंकुश चितळे, शेवगाव तालुकाप्रमुख अविनाश मगरे, माजी पं. स. सदस्य विष्णूपंत पवार, महिला जिल्हा संघटक मंगल म्हस्के, प्रवीण अनभुले, सविता ससे, ज्येष्ठ नेते एकनाथ कुसळकर, नवनाथ चव्हाण, मीरा बडे, राजेंद्र म्हस्के, सागर राठोड, भारत लोहकरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख सचिन नागापुरे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री गडाख म्हणाले पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील 70 जुन्या तलावाच्या दुरुस्ती व खोलीकरणासाठी सोळा कोटी रुपये व चौदा बंधार्‍यांसाठी दहा कोटींचा निधी देण्यात येत आहे. विकासाची कामे घेऊन जनतेच्या दारात जा. करोनाच्या स्थितीत जनतेचा आधार बना.

तालुकाप्रमुख अंकुश चितळे यांनी प्रस्ताविक व सुखदेव मर्दाने यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश मगरे यांनी आभार मानले.

पवारांचा गौरव…

पंचायत समितीमध्ये विष्णूपंत पवार हे एकमेव शिवसैनिक पंचायत समिती सदस्य असतानाही पाथर्डी पंचायत समितीच्या इमारतीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याबद्दल अनेक मान्यवरांनी भाषणातून पवारांचा गौरव केला.

‘कार्यकर्त्यांच्या पाठिशी राहू’

करंजी |वार्ताहर| Karanji

तालुक्यातील शिवसेना नेते अनिल कराळे व मोहन पालवे यांच्या निधनानंतर अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांना कोणत्याही प्रकारचा पोरकेपणा जाणवू देणार नाही, असा विश्वास मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला.

करंजी येथे शिवसंपर्क अभियानाची सुरुवात झाली. यावेळी शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, डॉ. विजय पाटील, उषाताई कराळे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके, उपतालुकाप्रमुख भारत वांढेकर, माजी तालुकाप्रमुख रफीक शेख, सुरेश वाघ, पंकज लांबहाते, उद्धव दूसुंगे, एकनाथ झाडे, भागिनाथ गवळी, जगदीश सोलाट, सुधाकर वांढेकर, शिवाजी मचे, दिलीप वांढेकर, सरपंच सतीश कराळे, प्रमोद गाडेकर, विलास टेमकर, गणेश पालवे, प्रकाश जगदाळे, अरुण भंडारे, किरण जाधव, गोकुळ लोंढे, बाळासाहेब घुले, बाळासाहेब कराळे, अशोक मिसाळ, गणेश तुपे, अंबादास टेमकर, बाळासाहेब टेमकर, अंबादास वारे, शरद गवळी, लक्ष्मण भानगुडे, सुरेश बर्फे, दत्तू कोरडे, सुनील कोरडे, शुभम गीते, भाऊसाहेब पालवे, मिठू पालवे, अशोक गुंजाळ, गुलाब जरे, संतोष कासार, शशिकांत होळकर, सागर पोटे, अक्षय तांदळे, सोमनाथ पोटे, रामचंद्र सिंपनकर, बाबासाहेब गवते, कैलास दुतारे, शरदराव अकोलकर, अशोकराव अकोलकर, बाबासाहेब क्षेत्रे, बाबासाहेब आकोलकर, भानुदास आकोलकर आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *