Thursday, April 25, 2024
Homeजळगावपारोळा पं.स.कार्यालयात मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ

पारोळा पं.स.कार्यालयात मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ

पारोळा – Parola

पंचायत समिती कार्यालयात दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दिव्यांगांचा सदर्भातील शासकिय योजना माहीती सहज व सुलभ मिळण्यासाठी तसेच दिव्यांगांची गैरसोय होऊ नये म्हणुन या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

- Advertisement -

उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी दिव्यांगांना VDZD(स्वावलंबन कार्ड) चे वाटप आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा समाज कल्याण अधिकारी भरत चौधरी, पंचायत समिती सभापती रेखाताई भिल, दिव्यांग प्रशिक्षनार्थी गुप्ता, गटविकास अधिकारी एन.आर. पाटील, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, विस्तार अधिकारी सुनिल पाटील, पंचायत समिती उपसभापती अशोक पाटील, पंचायत समिती सदस्य भिडुभाऊ जाधव,ज्ञानेश्वर पाटील, पांडुरंग पाटील, मोहाडी सरपंच रामचंद्र पाटील, पाटील, शेतकी संघाचे सभापती राजेंद्र पाटील, जिजाबराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे, नगरसेवक अशोक चौधरी, गणेश पाटील, समाधान मगर, बाळु पाटील, आबा महाजन आदी. तसेच संबंधित अधिकारी व तालुक्यातील दिव्यांग उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या