Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यातील धरणांमध्ये 'इतका' साठा शिल्लक

जिल्ह्यातील धरणांमध्ये ‘इतका’ साठा शिल्लक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तीव्र उन (Heat) व पाण्याची (Water) वाढती मागणी यामुळे नाशिक जिल्ह्यात (Nashik District) लहान मोठ्या एकूण 24 धरणात (Dam) आता साठ टक्के साठा शिल्लक असून येत्या 15 ऑगस्टपर्यंत तोे पुरवावा लागणार आहे. त्यातील दहा टक्केे पाण्याची (Water) वाफच होणार आहे…

- Advertisement -

धरणातील एक टीएमसीतील 1.1 टक्का साधारण गळती धरली जाते. जानेवारीपर्यंत फारसे पाणी कमी होत नाही. मात्र नंतर त्यात गळती, बाष्पीभवन याचा समावेश होतो. एप्रिलपासून कमाल तापमान (Temperature) वाढू लागते.

मे महिन्यात तापमान चाळीशीपर्यंत गेले की उन्हाचा कडाका जसजसा वाढतो तसतसे बाष्पीभवनामध्येही वाढ होत जाते.सध्या नाशिक जिल्ह्यातील 7 मोठ्या व 17 मध्यम प्रकल्पांमध्ये 39304 दशलक्ष घनफुट म्हणजे 60 टक्के पाणीसाठा असून, सर्वात मोठे धरण असलेल्या गिरणामध्ये तब्बल 56 टक्के पाणी आहे. तर नाशिकच्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) 3366 दलघफू म्हणजे साठ टक्के साठा आहे. या मोठ्या प्रकल्पातील पाण्याचा वापर पिण्यासाठी शेती व उद्योगासाठी होतो.

गेल्यावर्षी दमदार पाऊस (Rain) झाल्यामुळे धरणेे भरली. नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणाचा (Girna Dam) उपयोग मालेगाव (Malegaon) व जळगावला (Jalgaon) तर इगतपुरीतील (Igatpuri) वैतरणा धरणाचा (Vaitarna Dam) उपयोग मुंबईला (Mumbai) होतो.

उन्हाच्या कडाक्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत जाणार आहे. एप्रिल व मे महिन्यांमध्येही तापमानाचा पारा 40 अंश सेल्सियसच्या पुढे गेल्यास बाष्पीभवनामध्ये (Evaporation) वाढ होणार आहे. मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यास 10 टक्के पाण्याची वाफच होणार आहे.

सध्या गंगांपूर धरण समुहात 65 टक्के, पालखेड समुहात 58 टक्के तर गिरणा समुहात 60 टक्के आहे. एकूण नाशिक जिल्ह्यात 65 हजार 664 दलघफू पाणीसाठयापैकी आजमितीस 39304 दलघफू पाणी शिल्लक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या