Friday, April 26, 2024
Homeनाशिकशेतकरीप्रश्नी वक्तृत्व स्पर्धा गाजली

शेतकरीप्रश्नी वक्तृत्व स्पर्धा गाजली

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

‘माझा शेतकरी कष्टकरी’ या विषयावर शेतक-यांची Farmers व्यथा मांडत व वक्तृत्वाची छाप पाडत सिल्वर लोटस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या Silver Lotus English Medium School तनिष्का भाऊसाहेब उगले हिने कै. लक्ष्मीबाई लेले वक्तृत्व स्पर्धेत Late. Lakshmibai Lele oratory competition प्रथम क्रमांक पटकावला.

- Advertisement -

चांडक कन्या विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत तालुक्यातील 22 शाळातील 41 विद्यार्थ्यांनी कोरोनाचे नियम पाळत भाग घेतला. स्पर्धेचे यंदाचे 58 वे वर्ष होते.

स्पर्धेचे उद्घाटन नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष एम.जी कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी अ‍ॅड. धिरेंद्र पोंक्षे, राहुल मुळे, शालेय समिती अध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम क्षत्रिय, मुख्याध्यापक बाळासाहेब हांडे, संजीवनीच्या मुख्याध्यापिका माया गोसावी, सरदवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा जेजुरकर व्यासपिठावर उपस्थित होते.

5 वी ते 7 वीच्या गटासाठी मातृभाषेचे महत्त्व, ऑनलाइन शिक्षणातील गमती जमती, कोरोना व्हायरस संकट की संधी, वाचन-एक संस्कार मनाचा, आई मला खेळायला जायचंय हे विषय देण्यात आले होते. त्यात रिद्धी राजेंद्र बनकरने प्रथम, प्रणव संदीप लोणारेने द्वितीय, ज्ञानेश्वरी सुभाष पवारने तृतीय पारितोषिक मिळवले. तर श्रद्धा संतोष शेजवळ व स्नेहल सुरेश पवार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

8 वी ते 10 वी गटासाठी भारताचे ऑलंपिकमधील सप्तरंगी यश, माझा शेतकरी कष्टकरी, दहशतवाद एक जागतिक समस्या, लॉकडाऊनमधील आश्चर्यकारक अनुभव, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे विषय देण्यात आले होते. त्यात तनिष्का भाऊसाहेब उगलेने प्रथम, सई मधुकर गुळेने द्वितीय तर श्रृती विनायक कदमने तृतीय क्रमांक मिळवत बाजी मारली. सायली संजय लोणारे व यश गंगाधर भुजबळ यांना उत्तेजनार्थ बक्षिसाने गौरवण्यात आले.

वाचनामुळे ज्ञान वाढते. वाचनाच्या सवयीने वक्तृत्व विकसित होते. त्यामूळे विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी असे आवाहन कुलकर्णी यांनी केले. विजेत्यांना अ‍ॅड. पोंक्षे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या युगात आपले विचार ठळक व सुस्पष्टपणे मांडण्याचे कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन यावेळी अ‍ॅड. धिरेंद्र पोंक्षे यांनी केले. माजी मुख्याध्यापिका माधवी पंडित व शिवाजी रेवगडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

प्रास्ताविक मुख्याध्यापिका रेखा हिरे यांनी केले. कुणाल जोशी व रेश्मा पवार यांनी स्पर्धेचे नियोजन केले. पर्यवेक्षक कोटकर यांनी पाहूण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचलन निलीमा दुसाने व प्रिया कुलकर्णी यांनी केले. आभार संदीप सरोदे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या