Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमागच्या वर्षीची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना ठेवले शाळेच्या बाहेर

मागच्या वर्षीची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना ठेवले शाळेच्या बाहेर

पुणे |प्रतिनिधी| Pune

राज्यामध्ये आज शाळेची (School) घंटा वाजली असताना पुण्यामध्ये सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) ज्ञानगंगा शाळेत (Gyanganga school) मागच्या वर्षीची फी (Fees) भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना (Student) शाळेच्या बाहेर ठेवण्याचा प्रकार घडला. शाळेच्या (School) पहिल्याच दिवशी अशाप्रकारची अपमानास्पद वागणूक (Abusive Behavior) शाळेकडून मिळाल्यामुळे पालक आणि विद्यार्थी आक्रमक (Aggressive) झाले होते. त्यानंतर शाळेने नमती भूमिका घेतल्यानंतर वातावरण शांत झाले.

- Advertisement -

फी (Fees) भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यानंतर आक्रमक झालेल्या पालकांसमोर शाळा प्रशासनाने नमती भूमिका घेतली. पालकांना फी भरण्यासाठी मुदत वाढवून देणार असल्याचं प्राचार्या रेणुका दत्ता यांनी आश्वासन दिलं आहे.

आम्ही पालकांना (Parents) यापूर्वी वेळोवेळी फीसाठी मागणी (Fees Demand) केली होती आणि याची पूर्वकल्पना दिली असल्याची माहिती प्राचार्य दत्ता यांनी दिली. पुढील काळामध्ये पालकांना मुदतवाढ दिली जाईल. मात्र फी भरावी लागणारच आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळत असला तरीही फीचा भार पालकांच्या डोक्यावर असणार आहे.

दरम्यान, पालकांच्या आक्रमक भूमिकेनंतर शिक्षणाधिकारी सचिन काळे (Education Officer Sachin Kale) यांनी शाळेला भेट दिली. शाळेत गेल्यानंतर विरोधाभास पाहायला मिळाला असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. शाळेची चुकी असेल तर शाळेवर कारवाई करण्याचा इशारा (Hint) शिक्षणाधिकारी सचिन काळे (Education Officer Sachin Kale) यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या