Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशजीएसटी विवरणपत्रांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

जीएसटी विवरणपत्रांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली –

वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी ही

- Advertisement -

मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती.

दोन कारणांमुळे जीएसटीआर दाखल करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. यातील मुख्य कारण म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव होय. जीएसटी नोंदणीकृत करदात्यांकडून जीएसटीआर-9 आणि जीएसटीआर-9 सी अशी दोन विवरणपत्रे सादर केली जातात. जीएसटीआर-9 हे विवरणपत्र प्रत्येक नोंदणीकृत करदात्यास सादर करणे बंधनकारक आहे. जीएसटीआर-9 सी विवरणपत्र दोन कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांसाठी आहे. अशा करदात्यांना आपल्या व्यवसायाचे अंकेक्षण करणे बंधनकारक असते.

ज्यांची एकूण उलाढाल दोन कोटी रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी 2018-19 या वर्षाचे विवरणपत्र (जीएसटीआर-9/जीएसटीआर-9 अ) सादर करणे ऐच्छिक आहे. जीएसटीआर-9 मुदतीत सादर न केल्यास दररोज 100 रुपये विलंब शुल्क लागणार आहे. सीजीएसटी आणि एसजीएसटी यांना हे शुल्क लागू असून, अशा प्रकारे उशिरासाठी दररोज 200 रुपये शुल्क या करदात्यांना भरावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, कर अंकेक्षण अहवाल, अंकेक्षण प्रकरणातील प्राप्तिकर विवरणपत्रे आणि वार्षिक सर्वसाधारण सभांना मुदतवाढ देण्याची मागणी कर व्यावसायिकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्याकडे केली आहे. कर अंकेक्षण अहवाल सादर करण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत व प्राप्तिकर विवरणपत्रे सादर करण्यास 1 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या