Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदिव्यांग आयुषला नॅबकडून लॅपटॉप भेट

दिव्यांग आयुषला नॅबकडून लॅपटॉप भेट

सातपूर । प्रतिनिधी

नॅब संचालित श्रीमती चंद्रभागाबाई नरसिंगदासजी चांडक डेफ ब्लाइंड मल्टिपल डिसॅबिलिटी सेंटरच्या प्रकल्पाअंतर्गत केटीएचएम विज्ञान महाविद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी आयुष राजेश खैरे याला अभ्यासासाठी नॅब युनिट महाराष्ट्रकडून लॅपटॉपची भेट देण्यात आली.

- Advertisement -

केटीएचएम विज्ञान महाविद्यालयामध्ये 11 वी सायन्समध्ये शिकणार्‍या आयुषला ऑनलाईन शिक्षणासाठी लॅपटॉपची आवश्यकता जाणवू लागली. नॅब युनिट महाराष्ट्राशी संपर्क करून मागणी केली असता त्वरित याची दखल घेऊन आयुषसाठी एक नवा लॅपटॉप विकत घेतला.

नाशिकरोडच्या करण बॉटलिंग प्लांट प्रा. लि. यांच्याकडून याकामी मोलाचे आर्थिक सहकार्य मिळाले. ऑटिझम दिनाच्या पूर्वसंध्येला नॅब संकुलातील सभागृहात आयोजित छोटेखानी अनौपचारिक कार्यक्रमात आयुषला केटीएचएम विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्हि.बी. गायकवाड यांच्याहस्ते हा लॅपटॉप प्रदान करण्यात आला.

व्यासपीठावर रामेश्वर कलंत्री, गोपी मयूर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सूर्यभान साळुंखे, विनोद जाजू आणि. प्राध्या.डॉ. शिंदे आदी मान्यवर होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी केले.

याप्रसंगी नॅब युनिट महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी स्वागत करून करोनाकाळात केलेल्या कामाची माहिती दिली. कार्यक्रमाला नॅब युनिट महाराष्ट्राचे संचालक विनोद जाधव, नॅबच्या बहुविकलांग प्रकल्पाच्या मुख्याध्यापिका पूजा भालेराव, वाल्मिक पाटील, रत्नाकर गायकवाड आदींसह नॅबचे अधिकारी, शिक्षक व कर्मचारी तसेच आयुषचे वडील राजेश खैरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या