Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रभूखंड घोटाळा : एकनाथ खडसेंची ईडीकडून साडेसहा तास चौकशी

भूखंड घोटाळा : एकनाथ खडसेंची ईडीकडून साडेसहा तास चौकशी

मुंबई –

पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांची आज सक्तवसुली संचालनालय अर्थात

- Advertisement -

ईडीकडून साडे सहा तास चौकशी करण्यात आली.

ईडीकडून चौकशी दरम्यान आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. ईडीला जेव्हा-जेव्हा गरज भासेल तेव्हा सहकार्य करु असे चौकशी संपल्यानंतर एकनाथ खडसे यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावून त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र करोनाची लागण झाल्याने खडसे हजर राहिले नव्हते. आज खडसे यांनी सकाळी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले. खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचीही चौकशी करण्यात आली. खडसे यांची सुमारे साडे सहा तास कसून चौकशी करण्यात आली. ईडीच्या चौकशी नंतर खडसे संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास कार्यालयातून बाहेर पडले.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईडी मला जेव्हा जेव्हा कागदपत्रे आणि चौकशीसाठी बोलावेल तेव्हा तेव्हा मी हजर राहणार असून, ईडीला सर्व सहकार्य करणार आहे,अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली मात्र, आज झालेल्या साडे सहा तासाच्या चौकशीत काय विचारणा करण्यात आली, हे सांगणे खडसेंनी टाळले.

चौकशी संदर्भात मला ईडीने नोटीस बजावली होती.त्यासाठी मी आज हजर राहिलो.या अगोदर दोनवेळा भोसरी जमीन प्रकरणी चार वेळा चौकशी झाली आहे.आता ईडीकडून पाचव्यांदा चौकशी केली जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने,आयकर विभागाने आणि जोटिग कमिटीने या प्रकरणी सखोल चौकशी केली आहे.त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी दिली आहेत, असे सांगून आजच्या चौकशीत ईडीकडून कोणताही दबाव आलेला नाही असेही खडसे यांनी स्पष्ट केले.पुण्यातील भोसरी येथे खरेदी केलेल्या जमिनीमुळे ते वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमध्ये असताना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर खडसे हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे गेले होते. त्यांना या प्रकरणी तिन्ही यंत्रणांकडून क्लीन चिट देण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या