Wednesday, April 24, 2024
Homeनगरजमीन विक्रीवरून एजंटमध्ये हाणामारी

जमीन विक्रीवरून एजंटमध्ये हाणामारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुंबई शहरात विक्रीस असलेल्या जमिनीच्या मूळ मालकाचा फोन नंबर दे, असे म्हणत नगरमधील एका एजंटाने दुसर्‍याला मारहाण केली. मारहाणीची ही घटना जुने कलेक्टर ऑफिस परिसरातील पराग बिल्डिंग येथे सोमवारी (दिनांक 22 मे) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

सुजित घंघाळे (रा. माळीवाडा वेशीजवळ, माळीवाडा) असे गुन्हा दाखल झालेल्या एजंटाचे नाव आहे. याबाबत राजू चिनाप्पा ऑगस्टीन (रा. शांतीनगर, सोलापूर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी ऑगस्टीन यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची पुणे येथील मयूर देशपांडे यांच्याशी ओळख आली होती. मयूर देशपांडे यांची मुंबईतील मुलुंड भागात जमीन आहे. ती त्यांनी विक्रीस काढली होती.

याबाबत देशपांडे यांनी ऑगस्टीन यांनाही सांगितले होते. ऑगस्टीन हेही मुंबईतील जमिनीसाठी ग्राहक शोधत होते. त्यांनी घंघाळे व जमिनीचे मूळ मालक देशपांडे यांची पुण्यात भेट घालून दिली. त्यानंतर ऑगस्टीन यांच्यासह घंघाळे आणि मुंबईतील दोन एजंट यांची पुण्यात पुन्हा बैठक झाली; परंतु जमिनीचे मूळ मालक बैठकीला आले नाही. तसेच त्यांनी कुणाचाही फोन घेतला नाही. त्यामुळे ऑगस्टीन यांनी त्यांच्या वकीला फोन लावला.

त्यांनी तुम्ही मला फोन करू नका नाही, तर तुमचे व माझे वाद होतील, असे सांगितले. त्यामुळे ऑगस्टीन यांनी देशपांडे व त्यांच्या वकिलाचा फोन डिलीट केला. घंघाळे यांनी ऑगस्टीन यांना पराग बिल्डिंग बोलावून घेतले व देशपांडे यांचा मोबाइल नंबर देण्याची मागणी केली. त्यावर देशपांडे यांचा मोबाइल नंबर डिलीट केला आहे, असे ऑगस्टीन यांनी घंघाळे यांना सांगितले. त्याचा राग आल्याने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या