Thursday, April 25, 2024
Homeनगरभूमिअभिलेख कार्यालयासमारे शेतकर्‍याचे उपोषण

भूमिअभिलेख कार्यालयासमारे शेतकर्‍याचे उपोषण

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शेतजमिनीची रखडलेली तातडीची मोजणी करावी या मागणीसाठी तालुक्यातील भोसे येथील शेतकरी सुभाष बाबुराव टेमकर यांनी पाथर्डी येथील उपअधीक्षक भुमि अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण केले.

- Advertisement -

याबाबत टेमकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2020 मध्ये जमिनीची मोजणी करण्यासाठी रितसर अर्ज करून त्याची फी भरली होत. मात्र आज पर्यंत जमिनीची मोजणी झाली नाही. तुमचे कागदपत्र गहाळ झाल्याचे कार्यालयाकडून कारण देत ही मोजणी केली नसल्याचे सांगितले जाम आहे.

पुन्हा शेतजमीनीची मोजणी करण्यासाठी 16 मार्च 2022 रोजी पाथर्डीच्या भुमी अभिलेख कार्यालयात अर्ज दिलेला आहे. त्याची तातडी मोजणी फी भरलेली असून अद्याप जमिनीची मोजणी झाली नाही. माझ्यावर नाहक अन्याय होत आहे. आपण आजारी असतानाही उपोषण करत असल्याचे टेमकर यांनी सागीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या