शंभरावर अतिक्रमणे जमीनदोस्त

jalgaon-digital
2 Min Read

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

रस्ते (Road), गटारी (Gutters) व नाल्यांवर सिमेंटचे ढापे बांधून तसेच टपरी व इतर अतिक्रमण (Encroachment) थाटण्यात आल्याने स्वच्छतेस अडसर निर्माण झाला आहे.

पहिल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने (heavy rain) गटारी, नाले तुंबल्याने सर्वत्र पाणी साचले होते. या अतिक्रमणांची अखेर मनपा प्रशासनाने गंभीर दखल घेत अतिक्रमण विरोधी धडक मोहीम (Anti-Encroachment Campaign) हाती घेतली असून पहिल्याच दिवशी कॅम्परोड, वर्धमाननगर परिसरातील शंभरावर अतिक्रमणे जेसीबीच्या (JCB) सहाय्याने जमीनदोस्त केली गेली.

सूचना देऊन देखील अतिक्रमण (Encroachment) न काढणार्‍यांचे साहित्य अतिक्रमण विरोधी पथकातर्फे जप्त करण्यात आले. गटीरींवर केलेले सिमेंटचे पक्के बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात येऊन गटारी मोकळ्या केल्या गेल्या. चारही प्रभागात दोन पथकांद्वारे ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. अतिक्रमण काढण्यास विरोध करणार्‍यांविरूध्द गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील खडके (Sunil Khadke, Assistant Commissioner, Encroachment Department) यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

चार दिवसांपुर्वी सायंकाळी दोन ते तीन तास झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. सखल भागात गुडघाभर पाण्यातून नागरिकांना मार्गक्रमण करण्याची वेळ आल्याने मनपाच्या कारभाराविरूध्द जनतेत तीव्र असंतोष पसरला होता. शहरात पाणी तुंबल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी (Commissioner Bhalchandra Gosavi) यांनी उपायुक्त सतिश दिघे (Deputy Commissioner Satish Dighe), अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी (Additional Commissioner Ganesh Giri), लेखाधिकारी राजू खैरनार, सचिन महाले आदी अधिकार्‍यांसह परिस्थितीची पहाणी केली होती.

गटारी, नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे स्वच्छतेस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त गोसावी यांनी अतिक्रमण विभागास (Encroachment Department) धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना 48 तासांचा अल्टीमेटम देखील देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्रभाग एक व दोनसाठी एक पथक व प्रभाग तीन व चारसाठी एक पथक नियुक्त करण्यात आले.

प्रत्येक पथकात 25 अधिकारी-कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दोन जेसीबींच्या सहाय्याने या पथकांनी अतिक्रमण निर्मुलनास प्रारंभ केला. कॅम्परोड ते वर्धमाननगर तसेच मोसमपूल ते रावळगाव नाका या भागातील अतिक्रमणे काढण्यात आली. 80 अतिक्रमण धारकांवर या मोहिमेंतर्गत कारवाई केली गेली. अनेकांचे साहित्य पथकातर्फे जप्त केले गेले. मोहिमेस प्रारंभ होताच अनेक अतिक्रमण धारकांनी स्वत:हून आपली अतिक्रमणे काढून घेतली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *