Thursday, April 25, 2024
Homeनगरहाणामारी करणारे सहा अटकेत

हाणामारी करणारे सहा अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

न्यायालयात (Court) सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून (Land Dispute) निंबोडी (ता. नगर) गावात भोसले व भिंगारदिवे या कुटुंबामध्ये हाणामारीची (Beating) घटना शनिवारी (3 जून) घडली होती. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, दोन्ही कुटुंबातील सहा जणांना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.

- Advertisement -

शासकीय योजना पैसे खाण्यासाठी आहेत का?

शैलेश रामदास भोसले, सुरज जगन्नाथ शिंदे अशी एका कुटुंबातील अटक (Arrested) केलेल्यांची नावे आहेत. तर दुसर्‍या कुटुंबातील संदीप उर्फ कुशाभाऊ पोपट भिंगारदिवे, संतोष लहानू भिंगारदिवे, किरण मनोहर भिंगारदिवे, दत्तात्रय शंकर भिंगारदिवे (सर्व रा. निंबोडी) यांना अटक (Arrested) केली आहे. सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.

ज्यांची चौकशी सुरू, तेच मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, अंमलदार बाबासाहेब अकोलकर, गणेश नागगोजे, कैलास सोनार, रेवननाथ दहीफळे, संदीप घोडके, राहुल व्दारके, दिलीप शिंदे यांनी केली आहे.

संगमनेरच्या प्रवरा नदीपात्रात अकोलेच्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या