Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशलालू प्रसाद यादव ‘एम्स’मध्ये दाखल

लालू प्रसाद यादव ‘एम्स’मध्ये दाखल

रांची –

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. रांचीतील रिम्स रूग्णालयातून त्यांना शनिवारी संध्याकाळी

- Advertisement -

दिल्लीच्या एम्स रूग्णालयात हलवण्यात आले. लालूप्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहर्‍यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती त्यांचा मुलगा आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी दिली आहे.

दरम्यान, लालू प्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यावर मागील काही महिन्यांपासून रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या