लालपरीचा चक्का जाम

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

एसटी महामंडळाचे (ST Corporation) राज्य शासनात (state government) विलीनीकरण (Merger) करावे, तसेच महागाई भत्त्यात (Dearness allowance) वाढ करावी, आदी मागण्यांसाठी कृती समितीच्या (Action Committee) नेतृत्वात बुधवारपासून आंदोलनाला (agitation) सुरुवात झाली.

या आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यात आज गुरुवारी जिल्हाभरातील तब्बल साडेचार कर्मचार्‍यांनी उपोषण केलेल्या बससेवा ठप्प झाली होती. कर्मचार्‍यांच्या उपोषणामुळे जळगाव विभागातून एकही बस सेवा देण्यासाठी बाहेर पडली नाही. त्यामुळे जिल्ह्यासह जिल्हाबाहेरील अशा एकूण 1 हजार 9 एवढ्या बसफेर्‍या रद्द होवून जवळपास 50 लाखापर्यंत महसूल बुडाल्याचा अंदाज आहे. दरम्यान लालपरीची चाके थांबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनात संपूर्ण जिल्ह्यातील 4 हजार 500 कर्मचारी आंदोलनात उतरल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. जळगाव आगारात गुरुवारी सकाळपासूनच सर्वत्र केवळ एसटी कर्मचारीच दिसून येत होते. आंदोलनामुळे बस आगारात बंद, आंदोलक आवारात तर प्रवासी चौकशी खिडकीजवळ अशी स्थिती गुरुवारी दिवसभर दिसून आली.

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलन पुकारल्याने व याची माहिती अनेक प्रवाशांना नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात प्रवासी चौकशी खिडकीजवळ विचारणा करताना दिसून आले. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील 609 फेर्‍या आणि जिल्हाबाहेरील 400 अशा एकूण 1 हजार 9 फेर्‍या रद्द झाल्या. त्यामुळे बसचे चाक बंद पडून एसटीला 50 लाखांचा फटका बसला आहे.

प्रवाशासह चाकरमान्यांचे हाल

आंदोलनामुळे एकही बस आगाराच्या बाहेर पडली नाही. एस.टी. कर्मचार्‍यांच्या अचानकच्या आंदोलनामुळे बसस्थानकात आलेल्या प्रवाशासह विविध ठिकाणी नोकरीवर जाणार्‍या नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. बसस्थानकात आलेले अनेक प्रवासी सकाळपासूनच स्थानकावर आले होते. मात्र बस बंद असल्याने त्यांना खाजगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आली तर काही प्रवासी बस सुरू होतील या अपेक्षेने दुपारपर्यंत थांबून होते.

अशा आहेत मागण्या…

एसटी महामंडळोच शासनात विलीनीकरण करावे, कर्मचार्‍यांना 28 टक्के महागाई भत्ता लागू करावा, वार्षिक वेतनवाढ 2 वरून 3 टक्के मान्य केलेल्या तारखेपासून लागू करावी, सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र व राज्य शासनाने लागू केलेला घरभाडे भत्ता सुधारित दराने लागू करावा, ठरलेल्या तारखेला वेतन मिळावे, दिवाळी भेट अधिकारी व कर्मचारी असा भेद न करता मिळावी, थकबाकीची रक्कम एकरकमी मिळावी. या आंदोलनात कामगारांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपोषणाला बसले आहेत.

यात इंटकचे विभागीय सचिव नरेंद्रसिग राजपूत, कामगार सेनेचे आर. के. पाटील, कामगार संघटनेचे योगराज पाटील, कास्ट्राईबचे शैलेश नन्नवरे, विभागीय अध्यक्ष विनोद शितोळे, गोपाळ पाटील, संदीप सूर्यवंशी, सुरेश तायडे, कैलास सोनवणे, रवी पाटील यांच्यासह जळगाव आगारातील कामगार व कर्मचार्‍यांनी तसेच महिला चालक व वाहनांनी मोठ्या संख्येत उपोषणात सहभाग घेतला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *