Thursday, April 25, 2024
Homeनाशिकललित रुंग्ठा ग्रुप 'आयकॉन ऑफ महाराष्ट्र'

ललित रुंग्ठा ग्रुप ‘आयकॉन ऑफ महाराष्ट्र’

नाशिक |प्रतिनिधी Nashik

रिअल इस्टेट ग्रुपमध्ये कार्यरत असलेल्या येथील ललित रुंठा ग्रुपला यंदाचा ‘आयकॉन ऑफ महाराष्ट्र’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नुकत्याच राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते रुंठा ग्रुपचे निखिल रुंग्ठा यांनी पुरस्कार स्वीकारला.

- Advertisement -

बांधकाम क्षेत्रातील नामांकित ग्रुप म्हणून ललित रुग्ठा ग्रुप परिचित आहे. नाशिकमध्ये गेल्या अनेक .वर्षांपासून त्यांनी निवासी व वाणिज्य प्रकल्प उभारलेले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देताना गुणवत्तेशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादित केला असून गुणवत्ता व पारदर्शक व्यवहार या बळावरच रुंठा ग्रुपने येथवर मजल मारली आहे. ‘आयकॉन ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्कारांमुळे रुंग्ठा ग्रुपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ग्राहकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास व कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आज आम्ही या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी ठरलो आहोत. या सन्मानामुळे आमची जबाबदारी वाढली असून येत् काळात अधिकाधिक दर्जेदार प्रकल्प साकारण्यावर आमचा भर राहील.

ललित संग्ठा, एम. डी. रुग्ठा ग्रुप

- Advertisment -

ताज्या बातम्या