Monday, April 29, 2024
Homeक्रीडाAll England Championship : भारतीय बॅडमिंटनपटू 'लक्ष्य सेन'ने रचला इतिहास!

All England Championship : भारतीय बॅडमिंटनपटू ‘लक्ष्य सेन’ने रचला इतिहास!

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने (Lakshya Sen) ऐतिहासिक विजय नोंदवत ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या (All England Championship) अंतिम फेरीत धडक मारली आहे.

मलेशियाच्या ली झी जिआवर २१-१३, १२-२१, २१-१९ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला. प्रकाश नाथ, प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद आणि सायना नेहवालनंतर या प्रतिष्ठेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा लक्ष्य हा पाचवा भारतीय खेळाडू आहे.

- Advertisement -

२००१ साली पुलेला गोपीचंदने (Pullela Gopichand) ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये गेलेला लक्ष्य हा पहिला भारतीय पुरूष बॅडमिंटनपटू आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात १ तास १६ मिनीटं चाललेल्या लढतीत लक्ष्यने मलेशियन खेळाडूची कडवी झुंज मोडून काढली. ली झी जिआ हा या स्पर्धेचा माजी विजेता होता.

पहिल्या सेटमध्ये लक्ष्यने लाजबाब खेळ केला, विशेषकरुन लक्ष्यने केलेल्या बचावामुळे मलेशियाचा खेळाडू चांगलाच चिंतेत जाणवत होता. परंतू ली ने दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारत लक्ष्यला बॅकफूटला ढकललं.

तिसऱ्या सेटमध्येही ली ने निर्णयाक आघाडी घेतली असली तरीही लक्ष्यने गुणांचं अंतर मोठं राहणार नाही याची काळजी घेतली. ली १६-१२ अशा गुणांनी आघाडीवर असताना लक्ष्यने सामन्यात निर्णयाक क्षणी कमबॅक करत सामन्यात बाजी मारली.

यापूर्वी २००५ साली सायना नेहवालनं स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावलं होतं. १९८० आणि १९८१ साली प्रकाश पदुकोण यांनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.यापैकी एकदा त्यांना विजेतेपद पटकावण्यात यश आले होते.

तर १९४७ साली प्रकाश नाथ हे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेले पहिले भारतीय ठरले होते. लक्ष्यनं या स्पर्धेच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या एंडर्स एंटोनसनचा पराभव केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या