Thursday, April 25, 2024
Homeनगरपद्मश्री राहिबाई पोपेरे यांना लक्ष्मीबाई जीवनगौरव पुरस्कार

पद्मश्री राहिबाई पोपेरे यांना लक्ष्मीबाई जीवनगौरव पुरस्कार

अकोले (प्रतिनिधी)

राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या आणि ज्ञानगंगा दारोदारी पोहोचवणाऱ्या रयत शिक्षण संस्थे तर्फे दिला जाणारा देश पातळीवरील मानाचा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार यंदा बीज माता पद्मश्री राहिबाई सोमा पोपेरे यांना जाहीर झाला आहे. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

- Advertisement -

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त २२ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या व्हर्च्यूअल कार्यक्रमांमध्ये या पुरस्काराची घोषणा त्यांनी केली. अडीच लाख रुपये रोख सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रमात येत्या ९ मे २०२२ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा लक्ष्मीबाई जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदा तो बीजमाता राहीबाई पोपेरे यांना जाहीर झाल्यामुळे अकोले तालुक्यात आणि संपूर्ण राज्यामध्ये हे आनंदाचे वातावरण आहे. योग्य व्यक्तीला पुरस्कार दिल्याचे समाजात सर्वांना समाधान आहे.

देश आणि विदेशात अकोले तालुक्याचे नाव धडकणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या कार्याची दखल शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने घेतल्याबद्दल बायफ संस्थेचे रिजनल डायरेक्ट व्ही बी याचा यांनी रयत शिक्षण संस्थेचे आभार मानले आहेत. राज्य समन्वयक सुधीर वागळे यांनी पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या