Friday, April 26, 2024
Homeनाशिकलखमापूर केंद्राची ऑफलाईन शिक्षण परिषद

लखमापूर केंद्राची ऑफलाईन शिक्षण परिषद

लखमापूर । वार्ताहर | Lakhmapur

लखमापूर (Lakhmapur) येथील जि. प. केंद्राचे केंद्रप्रमुख संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ऑफलाईन शिक्षण परिषद (Offline Education Council) उत्साहात संपन्न झाली.

- Advertisement -

शिक्षण परिषदेची (Council of Education) सुरुवात लखमापूर गावाच्या सरपंच संगिता दळवी, उपसरपंच नाना सोनवणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण देशमुख, तलाठी गोसावी यांच्या हस्ते विद्येची आराध्य देवता, सरस्वती मातेच्या पूजनाने केली.

केंद्रप्रमुख, संजय जगताप, मुख्याध्यापिका हर्षा अढांगळे व गुलाब देशमूख, बाळू खराटे यांनी ही सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. शिक्षण परिषदेच्या सुरुवातीला सरपंच दळवी यांनी करोना (corona) काळात शिक्षकांनी (teachers) ऑनलाईन केलेल्या कामाचे कौतुक केले. यानंतर संजय जगताप यांनी शिक्षण परिषदेविषयी प्रास्ताविक केले.

प्रास्ताविकानंतर नौशाद यांनी ओपनींग अ‍ॅक्टीव्हीटी (Opening Activity) घेतली. यात बाळू खराटे ( लखमापूर) संध्या परदेशी (अवनखेड) यांनी उत्सफुर्तपणे भाग घेऊन सर्वांची मने जिंकून घेतली. यानंतर मागील महिन्याच्या शिक्षणपरिषदेचा आढावा घेवून चर्चा करण्यात आली. तंत्रस्नेही शिक्षक रामेश्वर टिपरे यांनी संप्रेषणाची तासिका घेतांना

डायट कॉलेजचे प्राचार्य प्रा. अनिल गौतम यांनी संप्रेषण व परिणामकारक संप्रेषण यावर आधारित मार्गदर्शनाचा व्हिडीओ दाखवला व विडीयोवर चर्चा घडवून आणली. नौशाद यांनी 25 मुद्द्यांवर चर्चा करून सहमत व असहमत यावर प्रत्येकाची मते जाणून घेतली.

सर्वांना त्यावर आत्मपरिक्षण करुन स्वयंमूल्यमापन करून गुणदान करावयास सांगितले. या तासिकेत पायाभूत साक्षरतेवर डी. डी. सुर्यवंशी वरिष्ठ अधिव्याख्याता यांचा व्हिडीओ सर्वांना दाखवला व त्यावर उपयुक्त चर्चा घडवून आणली.

या दोन्ही व्हिडीओनंतरच्या चर्चेत कृष्णा खंबाईत, प्रिती आहिरे, शिवलाल चौधरी, गणेश राऊत, रामदास जोपळे, संध्या परदेशी, संजय खरे, कल्पना पगार, ज्योती उगले यांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेतला. यानंतर डउएठढ आरंभित कार्यक्रमाची तासिका घेतांना 100 दिवस वाचन अभियान, देश हमारा, अभ्यासमाला 2.0, शिकू आनंदे, गोष्टीचा शनिवार, रुम टू रीड, नालंदा चॅटबोटची माहिती

रिड टू मी अ‍ॅपची माहीती व ते कसे डाऊनलोड करावे हे सांगितले. यावेळी सारिका लहाड, छाया देशमुख, शोभा पाटील, कौशल्या गायकवाड यांची चर्चेत सहभाग घेतला. शिक्षण परिषदेस लखमापूर, अवनखेड, करंजवण, खेडले, म्हेळुस्के, दहेगाव, वागळूद, परमोरी आदी गावातील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या