लखीमपूर खेरी प्रकरण : आशिष मिश्रांना ‘सर्वोच्च’ दणका, न्यायालयाकडून जामीन रद्द

दिल्ली | Delhi

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे आंदोलक शेतकऱ्यांना गाडीने चिरडल्याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Union Minister Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दणका दिला आहे.

लखीमपूर खेरी प्रकरणी आशिष मिश्रा याने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडली. यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला आहे. (Lakhimpur Kheri case latest news)

आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

तसेच मिश्राला एका आठवड्यात न्यायालयासमोर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सात दिवसात आत्मसमर्पण करावं, असं देखील न्यायालयाने म्हटलं आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

दरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारीला आशिष मिश्राला जामीन मंजूर केला होता. तसेच, १८ फेब्रुवारीला तो तुरुंगातून बाहेर आला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे पाठवले आहे.

गुलाबाची कळी….! प्राजक्ता माळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *