Friday, April 26, 2024
Homeनाशिकदेवळालीत अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई

देवळालीत अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई

देवळाली कॅम्प । Deolali Camp

सव्वा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या देवळलीच्या स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी लाकडे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना संसरीसह इतर खाजगी वखारीवर अवलंबून राहावे लागत आहे.

- Advertisement -

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. मृतांच्या वाढत्या संख्येचा ताण येथील अमरधाम यंत्रणेवर येत असून अंत्यसंस्कारसाठी बेड मिळानासे झाले आहेत. त्यामुळे नाईलाजाने जमिनीवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे.

अशा परिस्थितीत एकीकडे अंत्यसंस्कारासाठी जागा नसतांना मृतदेहांवर अंत्यसंस्कासाठी लागणार्‍या लाकडांची व्यवस्था देखील होत नाही, ही शोकांतिका आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने दानशूरांच्या माध्यमातून वॉर्ड क्रंमांक 5 मधील स्टेंचिंग ग्राउंड परिसरात सुमारे 1 कोटी 35 लाख रुपये खर्च करून गेल्या वर्षीच नवी स्मशानभूमी उभारली. मात्र या ठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी लाकडांची व्यवस्था नसल्याने नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत.

वास्तविक सर्वच स्मशानभूमीजवळ ही व्यवस्था असते. मात्र देवळालीत तशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. नाशिक मनपाकडून अंत्यसंस्कारासाठी मोफत लाकडे पुरविले जातात. तिथे प्रत्येक स्मशानभूमी लगत तशी व्यवस्था करण्यात आली आहे. देवळालीत मात्र अद्यापही अशी सोय करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना लाकडासाठी वणवण करावी लागत आहे.

डिझेल शव दाहिनी व दशक्रिया विधी घाट केव्हा?

गेल्या नऊ महिन्यापूर्वी कॅन्टोमेन्ट बोर्डाने देवळालीकरांसाठी येथील स्टेंचिंग ग्राऊंडच्या तीन एक्कर परिसरात स्मशानभूमी बांधली. याठिकाणी एक डिझेल शव दाहिनीची व्यवस्था करण्यात आली असली तरी त्यासाठी लागणारी कुठलीही यंत्रसामुग्री अद्याप उपलब्ध करण्यात आलेली नाही. दारणा नदीकिनारी दशक्रिया विधी घाट उभारण्याबाबत मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव अद्यापही रखडला आहे.

कोविडबाबतचे नियम पाळून येथील स्मशानभूमीत नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली जात आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे रीतसर नोंद करणे गरजेचे आहे.

अजय कुमार, सीईओ, कॅन्टोन्मेंट बोर्ड

- Advertisment -

ताज्या बातम्या