Saturday, April 27, 2024
Homeनाशिकरेल्वेस्थानकावर नियोजनाचा अभाव

रेल्वेस्थानकावर नियोजनाचा अभाव

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नाशिकरोड रेल्वेस्थानक Nashikroad Railway Station, बसस्थानक NashikRoad Bus Depot परिसरातील वाहतूक कोंडीचा Traffic प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत आहे. हा प्रश्न धसास लावण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स Maharashtra Chamber of Commerce, इंडस्ट्री अँण्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला आहे. ​चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसेच मनपा आयुक्त कैलास जाधव यांची नुकतीच भेट घेतली.

- Advertisement -

नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात वाहतुकीचे नियोजन करावे, अशी मागणी केली. पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनाही त्याबाबतचे पत्र देण्यात आले.

नाशिकची ओळख मंत्रभूमी व यंत्रभूमी अशी आहे. देशभरातून धार्मिक कार्य करण्यासाठी, पर्यटनासाठी व व्यापार उद्योगाच्या निमित्ताने नाशिकला मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. नाशिकरोड रेल्वेस्थानक, बस स्थानक व रिक्षातळ एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

​रेल्वे स्थानकावर परिसरात वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणात खोळंबा होत असतो, अपघात होणे, पायी चालणे तर कठीणच होते हे चित्र शहरासाठी अयोग्य आहे. बाहेरून येणार्‍या नागरिकांना रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतुकीच्या खोळंब्याने त्रास होतो. वाहतुकीची ही परिस्थिती सुधारण्यासाठी येथे वाहतुकीचे नियोजन होणे आवश्यक आहे. याचबरोबर रिक्षाचालकांनाही शिस्त लावल्यास परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी सांगितले.

याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे नाशिक शाखा चेअरमन सुनीता फाल्गुने, कार्यकारिणी सदस्य संजय राठी, नेहा खरे, रवि जैन, सचिन शहा, रतन पडवळ, सहायक सचिव अविनाश पाठक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या