Wednesday, April 24, 2024
Homeनगरकामगार नेते जीवन सुरूडे यांची पालिका कामगारांचे प्रश्न सोडविण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कामगार नेते जीवन सुरूडे यांची पालिका कामगारांचे प्रश्न सोडविण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

श्रीरामपूर | प्रतिनिधी

शहरातील घन कचरा व्यवस्थापन वाऱ्यावर सोडून गेलेल्या पालिकेच्या ठेकेदाराची तक्रार आज अहमदनगर जिल्हा नगर पालिका कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने कॉम्रेड जीवन सुरुडे व कामगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.

- Advertisement -

शहरातील आरोग्याचा प्रश्न त्यामुळे बिकट बनला असून शेकडो कामगारांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असल्याने याप्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज भल्या सकाळी शहरात भेट दिली. येथील विश्रामगृहात आमदार लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार, पालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, पोलिस निरीक्षक आयुष नोपानी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी भोसले यांनी याप्रश्नी तातडीने शहराचा स्वच्छतेचा प्रश्न व कंत्राटी कामगारांचे प्रश्नांबाबत तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी ढेरे यांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या